News Flash

‘शेरनी’चा फर्स्ट लूक; विद्या बालन झळकणार दमदार भूमिकेत

पुढील महिन्यात अ‍ॅमेझान प्राईमवर हा सिनेमा रिलीज होणार आहे

अभिनेत्री विद्या बालन लवकच एक दमदार अंदाजात प्रेक्षकांच्या भेटीला येतेय. विदया बालनचा आगामी ‘शेरनी’ हा सिनेमा लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येतोय. पुढील महिन्यात अ‍ॅमेझान प्राईमवर हा सिनेमा रिलीज होणार आहे. अभिनेत्री विद्या बालनने सोशल मीडियावर या सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर केलंय.

‘शेरनी’ या सिनेमात विद्या बालन एका वन अधिकाऱ्याच्या भूमिकेत झळकणार आहे. फिल्ममेकर अमित मसुरकर हा या सिनेमाचा दिग्दर्शक असून अबंडनतिया एंटरटेनमेंटची निर्माती आहे. विद्यासोबत या सिनेमात अबिनेता शरद सक्सेना, मुकुल चड्डा, विजय राझ, इला अरुण, ब्रिजेंदर काला आणि नीरज काबी या अष्टपैलू कलाकारांचा समावेश आहे. या सिनेमाचं पहिलं पोस्टर शेअर करत विद्याने मोजक्या शब्दात तिच्या भूमिकेबद्दल चाहत्यांना सांगितलं आहे. एका निर्भयी अधिकाऱ्याच्या रुपात आश्वासक भूमिकेत विद्या या सिनेमातून चाहत्यांच्या भेटीला येतेय.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidya Balan (@balanvidya)

 

गेल्या वर्षी लॉकडाउनमुळे या सिनेमाचं शूटिंग शांबवण्यात आलं होतं. त्यानंतर ऑक्टोबर महिन्यात बायो बबलच्या मदतीने सॅनिटाझिंगचे सर्व नियम पाळून सिनेमाचं शूटिंग पुन्हा सुरू करण्यात आलं. मध्य प्रदेशमधील वन्य भागात या सिनेमाचं शूटिंग पूर्ण करण्यात आलं आहे.
आगामी अमेझॉन ओरीजनल मुव्हीबद्दल बोलताना अमेझॉन प्राईम व्हिडीओचे डायरेक्टर अँड हेड, कंटेंट विजय सुब्रमण्यम म्हणाले की, “मागील अनेक वर्षांपासून अबंडनतिया एंटरटेनमेंट कथाकारांचे पॉवरहाऊस बनले आहे, ताज्या दमाची आणि गुंगवून ठेवणाऱ्या कथा आमचे त्यांच्या सोबतचे नाते आणखी दृढ करतात. शकुंतला देवी यांची यशोगाथा प्रस्तुत केल्यानंतर आम्ही शेरनीकरिता उत्साही आहोत. ”

कधीही न साकारलेल्या भूमिकेत झळकणार विद्या

या विषयीचा उत्साह शब्दांत मांडताना अबंडनतिया एंटरटेनमेंटचे निर्माते आणि सीईओ विक्रम मल्होत्रा म्हणाले की, “2020 मध्ये ‘शकुंतला देवी’वर प्रेमाचा वर्षाव झाला. आम्ही काम करत असलेल्या शेरनीचे कथानक फारच विशेष आणि महत्त्वाचे आहे. विद्या बालनच्या चाहत्यांकरिता हा सिनेमा म्हणजे मेजवानी असणार आहे. कारण यापूर्वी कधीही न साकारलेल्या वनाधिकाऱ्याच्या भूमिकेत ती आपल्या भेटीला येणार आहे.”

टी सिरीजचे निर्माते भूषण कुमार म्हणाले की, “शेरनी ही वेगळ्या पद्धतीची कथा आहे, ती गुंतवून ठेवते. मला निर्माता म्हणून काम करण्याची संधी मिळाली आणि हा सिनेमा जगभरातील प्रेक्षकांकरिता अमेझॉन प्राईम व्हिडीओवर प्रीमियर होतो आहे, याकरिता मी आनंदी आहे.”

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 17, 2021 7:06 pm

Web Title: vidya balan upcoming movie sherni first look launch releasing on amazon prime in next month kpw 89
Next Stories
1 Video: गुजरातमध्ये ‘ये रिश्ता क्या कहलाता है’ मालिकेच्या सेटवर तौते चक्रीवादळाचं थैमान
2 तौते चक्रीवादळामुळे गोव्यात मोठं नुकसान; फोटो शेअर करत अभिनेता राजीव खंडेलवाल म्हणाला..
3 “आणि माझ्याबद्दल काही म्हणाल तर नागडं करेन”; इस्त्रायल मुद्द्यावरून ट्रोल करणाऱ्यांवर कंगना भडकली
Just Now!
X