अभिनेते आणि बॉलीवूडमध्ये आपल्या स्वत:च्या स्वतंत्र नृत्यशैलीचा ठसा उमटविलेले दिवंगत अभिनेते भगवानदादा यांच्या जीवनावरील ‘एक अलबेला’ या चित्रपटात बॉलीवूडची आघाडीची अभिनेत्री विद्या बालन काम करणार आहे.

चित्रपटाच्या चित्रीकरणास मंगळवारपासून सुरुवात झाली असून विद्या बालन हिने मुहूर्ताच्या दृश्यात भाग घेतला. अभिनेता मंगेश देसाई हा ‘भगवानदादा’ यांची, तर विद्या बालन ‘गीताबाली’ची भूमिका करणार आहेत. चित्रपटाचे दिग्दर्शन शेखर सरतांडेल यांचे आहे.
मंगेश देसाई आणि विद्या बालन यांच्यावर ‘शाम ढले खिडकी तले’ या गाण्याचे काही चित्रीकरण तसेच अन्य काही दृश्यांचे चित्रीकरण मंगळवारी मुंबईत गोरेगाव येथील चित्रनगरीत करण्यात आले.