News Flash

विद्युत जामवाला साप पकडायला गेला अन्…, पाहा व्हिडीओ

व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाला त्याच्या स्टंटमुळे नेहमीच चर्चेत असतो. सध्या सोशल मीडियावर त्याचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे. या व्हिडीओमध्ये विद्युत साप पकडत असल्याचे दिसत आहे. पण साप पकडत असताना विद्युतच्या हातात वेगळीच वस्तू आली आहे.

नुकताच विद्युतने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर व्हिडीओ शेअर केला आहे. व्हिडीओच्या सुरुवातीला एक जंगल दिसत आहे. जंगलात एका झाडाच्या खाली विद्युत बसला आहे आणि तेथे साप पकडण्याचा प्रयत्न करत असल्याचे तो भासवत आहे. विद्युतच्या बाजूला उभे असणारे लोकं त्याला सुचना देताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

This is how it’s done #CountryBoy

A post shared by Vidyut Jammwal (@mevidyutjammwal) on

व्हिडीओमध्ये विद्युतची साप पकडण्याची धडपड पाहून सर्वचजण आश्चर्यचकीत झाले आहेत. पण व्हिडीओच्या शेवटी विद्युतच्या हातात साप नाही तर बेल्ट पाहायला मिळतो. विद्युत तो बेल्ट झटकतो आणि जीन्सला लावतो. त्याचा हा मजेशीर व्हिडीओ सध्या सोशल मीडीयावर चर्चेत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 5, 2020 7:42 pm

Web Title: vidyut jammwal snake funny video viral on social media avb 95
Next Stories
1 “त्यांना माझी संपत्ती बळकावायचीय”; अभिनेत्रीचा वडिलांवरच आरोप
2 “पतीची लक्षण ठिक नव्हती”; ३ वर्षात अभिनेत्रीने घेतला घटस्फोट
3 न्यूड फोटो : पूनमवर गुन्हा, मिलिंदचं कौतुक – दिग्दर्शकाचं खोचक ट्विट
Just Now!
X