News Flash

VIDEO: रिअल लाईफ सुपरहिरो; अभिनेत्याने डोळ्यांवर ओतलं वितळतं मेण

खतरनाक व्हिडीओ: या बॉलिवूड अभिनेत्याचे स्टंट पाहून व्हाल थक्क

विद्युत जामवाल हा बॉलिवूडमधील एक लोकप्रिय अॅक्शन हिरो म्हणून ओळखला जातो. विविध प्रकारचे स्टंट आणि धमाकेदार फाईटिंग स्टाईलच्या जोरावर त्याने बॉलिवूडमध्ये स्वत:ची अशी वेगळी ओळख निर्माण केली आहे. लक्षवेधी बाब म्हणजे विद्युत हा इतर कलाकारांप्रमाणे केवळ रुपेरी पडद्यावर अॅक्शन करत नाही. तर खऱ्याखुऱ्या आयुष्यातही विविध प्रकारचे स्टंट करुन चाहत्यांना आश्चर्यचकित करतो.

अवश्य पाहा – ‘तुझ्यासारखी चमचेगीरी करत नाही’; शेतकरी आंदोलनावरुन कंगना-दिलजितमध्ये जुंपली

 

View this post on Instagram

 

A post shared by Vidyut Jammwal (@mevidyutjammwal)

अवश्य पाहा – अक्षय-सलमानलाही सोडलं मागे; हे ठरले २०२० मधील सर्वाधिक लोकप्रिय कलाकार

विद्युत हा एक तरबेज मार्शलआर्टिस्ट आहे. लहानपणापासून तो कलारिपयट्टू या फाईटिंग स्टाईलची ट्रेनिंग घेत आहे. आपल्या ट्रेनिंगचे व्हिडीओ तो सोशल मीडियावर शेअर करत असतो. यावेळी देखील असाच एक थक्क करणारा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो डोळ्यांवर पट्टी बांधून फाईटिंगचा सराव करताना दिसत आहे. लक्षवेधी बाब म्हणजे या व्हिडीओमध्ये त्याने आपल्या डोळ्यांवर चक्क वितळतं मेण देखील ओतलं आहे. हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 4, 2020 4:19 pm

Web Title: vidyut jamwal dangerous stunt mppg 94
Next Stories
1 काय??ब्रिटीश एअरवेजमधून अनन्या पांडेने चोरला नाईट सूट
2 कुटुंबाचा विरोध पत्करुन शर्मननं केला ‘हेट स्टोरी’; अन् त्यानंतर घडलं असं काही…
3 नीतू कपूर, वरुण धवन करोना पॉझिटिव्ह? ‘जुग जुग जियो’चं चित्रीकरण अर्ध्यावर
Just Now!
X