News Flash

VIDEO : जीममधील विद्युतचा हा व्हिडिओ पाहून तुम्हीही व्हाल हैराण

विद्युतचे हे व्हिडिओ अनेकांना तोंडात बोटं घालण्यास भाग पाडणारे असेच आहेत.

विद्युत जामवाल

सध्याच्या घडीला अनेक कलाकार जीममध्ये घाम गाळण्याला प्राधान्य देत असल्याचे चित्र आहे. मात्र, केवळ एखाद्या चित्रपटासाठी सिक्स पॅक अॅब्स करणे आणि फिटनेससाठी जीममध्ये जाणे यामध्ये बराच फरक आहे. बॉलिवूड अभिनेता विद्युत जामवाल हा नेहमीच त्याच्या फिटनेस आणि अॅक्शन सीन्ससाठी नावाजला जातो. पिळदार शरीरयष्टी असलेल्या या अभिनेत्याचे जीममधील वर्कआउट व्हिडिओ सर्वांना थक्क करणारे आहेत.

वाचा : अभिनेत्री स्मिता जयकर यांनी केले दुसऱ्यांदा लग्न

एरवी आपल्याला दहा किलो वजन उचलल्यावरही घाम येतो. पण, विद्युतने चक्क वजनदार टायर लावून केलेलं हे वेटलिफ्टींग अनेकांना तोंडात बोटं घालण्यास भाग पाडेल असेच आहे. इतकेच नव्हे तर काही दिवसांपूर्वी तर तो चार काचेच्या बाटल्यांवर पुशअप्स मारताना दिसला होता. हे व्हिडिओ पाहता विद्युतच्या फिटनेस आणि बॅलन्सचा पुरेपूर अंदाज येतो.

वाचा : हिना खान उधारीवर कपडे घेते, फॅशन डिझायनरचा आरोप

विद्युतचे चित्रपट अॅक्शन दृश्यांनी परिपूर्ण असतात. त्याच्या आगामी ‘जंगली’ चित्रपटातही अॅक्शनचा पुरेपूर भरणा असणार आहे. या चित्रपटात माणसं आणि हत्तींमध्ये असलेल्या अनोख्या नात्यावर प्रकाश टाकण्यात येईल. ‘द मास्क’, ‘ए नाईटमेर ऑन एल्म स्ट्रीट’, ‘द स्कॉर्पियन किंग’ आणि ‘आय एम व्रथ’ या चित्रपटांसाठी प्रसिद्ध असलेले दिग्दर्शक चार्ल्स रसेल यांच्या चित्रपटाचा ‘जंगली’ हा रिमेक आहे. हा चित्रपट पुढील वर्षी १९ ऑक्टोबरला प्रदर्शित होईल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 9:08 am

Web Title: vidyut jamwal incredible workout stunt for junglee will lelave u aww
Next Stories
1 अभिनेत्री स्मिता जयकर यांनी केले दुसऱ्यांदा लग्न
2 ‘टायगर जिंदा है’च्या तिकिटांची किंमत पाहून व्हाल थक्क
3 हिना खान उधारीवर कपडे घेते, फॅशन डिझायनरचा आरोप
Just Now!
X