30 March 2020

News Flash

VIDEO: कंगनाची सहायकावर आगपाखड!

कंगना व्हिडिओमध्ये सहायकावर भडकताना नजरेस पडते.

बॉलिवूडची ‘क्वीन’ कंगना राणावत मोठ्या पडद्यावरील भूमिकेत समरस होऊन एखाद्या संतप्त स्त्रीची भूमिका साकारताना तुम्ही अनुभवली असेल. परंतु प्रत्यक्ष आयुष्यात राग अनावर झालेली कंगना तुम्ही कदाचित पाहिली नसेल. कंगनाचा प्रत्यक्ष आयुष्यातील एक व्हिडिओ प्रसिद्ध झाला असून, व्हिडिओमध्ये ती सहायकावर भडकताना नजरेस पडते. व्हिडिओत कंगना सहायकाशी संवाद साधत असून, कंगनावर चित्रीत होणाऱ्या एका दृश्यात ड्युप्लिकेट वापरासंबधी सहायक तिला माहिती देताना दिसतो. आपण ड्युप्लिकेटसह काम करत नसल्याचे सांगत कंगना सहायकावर चिडते आणि ड्युप्लिकेटची काय आवश्यकता आहे, अशी विचारणा करते. कंगनाचे वजन जास्त असल्याने तिला दृश्य साकारताना अडचण येऊ शकते, असे सहायक तिला समजावून सांगतो. याबाबत आपल्याला केणीही पूर्व कल्पना दिली नसल्याची प्रतिक्रिया कंगना देते. चिडलेल्या कंगनाचा राग अनावर होऊन ती सहायकावर भडकते. या व्हिडिओच्या चित्रीकरण स्थळाविषयी अधिकृत खुलासा होऊ शकला नसला, तरी सूत्रांकडील माहितीनुसार तो ‘रंगून’ चित्रपटाच्या शुटिंगदरम्यान व्हॅनेटी व्हॅनमध्ये शूट झाल्याचे समजते. सध्या कंगना ‘रंगून’च्या चित्रीकरणात व्यग्र आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 8, 2016 4:12 pm

Web Title: viedo viral on internet actress kangana ranaut loses temper on the sets of film
टॅग Kangana Ranaut
Next Stories
1 ‘अभिनेत्रीचे चुंबन घेत नाही, तोपर्यंत चाहत्यांचे मन तृप्तच होत नाही’
2 ‘झी गौरव २०१६ पुरस्कारां’च बिगुल वाजलं; नामांकनांची संपूर्ण यादी
3 ‘६ पॅक बॅण्ड’ झाला शाहरुखचा फॅन
Just Now!
X