‘अर्जुन रेड्डी’ या सुपरहिट तेलुगू चित्रपटाचा हिंदी रिमेक ‘कबीर सिंग’ बॉक्स ऑफीसवर तुफान गाजला. यामध्ये शाहिद कपूर व कियारा अडवाणीने मुख्य भूमिका साकारली आहे. तर ‘अर्जुन रेड्डी’ या भूमिकेमुळे दाक्षिणात्य अभिनेता विजय देवरकोंडासुद्धा बॉलिवूडमध्ये प्रसिद्ध झाला. नुकत्याच एका शूटनिमित्त विजय आणि कियारा एकत्र दिसले. त्यांचा हा फोटो सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.
मुंबईत एका शूटनिमित्त विजय व कियारा एकत्र आले होते. यावेळी दोघांचाही पारंपरिक पोशाख पाहायला मिळाला. विजय निळ्या रंगाचा कुर्ता व सोनेरी रंगाची धोती तर कियाराने गुलाबी रंगाचा लेहंगा परिधान केला होता. कियारा व विजय या दोघांमध्ये चांगलीच मैत्री झाली आहे. ‘कबीर सिंग’ प्रदर्शित झाल्यानंतर विजयने तिच्यासाठी भेटवस्तू व पुष्पगुच्छ पाठवून शुभेच्छा दिल्या होत्या.

विजयचा ‘डिअर कॉम्रेड’ हा तेलुगू चित्रपट नुकताच प्रदर्शित झाला आहे. तर ‘कबीर सिंग’नंतर कियाराच्या हातात बरेच चित्रपट आहेत. ‘लक्ष्मी बाँब’, ‘शेरशाह’, ‘गुड न्यूज’, ‘इंदू की जवानी’ असे कियाराचे लागोपाठ चार चित्रपट आहेत. ‘एम.एस. धोनी’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारी कियारा ‘लस्ट स्टोरीज’ या वेब सीरिजमुळे प्रकाशझोतात आली.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 9, 2019 1:35 pm