26 January 2020

News Flash

..अन् या अभिनेत्याने सेटवरील ४०० जणांना गिफ्ट केल्या सोन्याच्या अंगठ्या

सेटवरील अनेकांनी या अंगठीचे फोटो सोशल नेटवर्किंगवर पोस्ट केले आहेत

गिफ्ट केल्या सोन्याच्या अंगठ्या

दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता विजय याचा बिगिल हा सिनेमा दिवाळीमध्ये प्रदर्शित होणार आहे. नुकतेच या सिनेमाचे शुटिंग पूर्ण झाले. शुटिंगच्या शेवटच्या दिवशी विजयने या सिनेमाच्या सेटवर काम करणाऱ्या सर्व ४०० जणांच्या टीमला एक सुखद धक्का दिला. विजयने या सिनेमाच्या चित्रिकरणामध्ये सहभागी असलेल्या सेटवरील प्रत्येकाला सोन्याची अंगठी भेट दिली. या अंगठीवर सिनेमाचे नाव म्हणजे ‘Bigil’ असं लिहिलेलं आहे.

विजयने अचानक दिलेल्या या भन्नाट भेटवस्तूमुळे अनेकांचा आनंद गगनात मावेनासा झाला आणि त्यांनी सोशल नेटवर्किंग साइटवर या अंगठीचा फोटो पोस्ट करत विजयचे आभार मानले. याआधी विजयने या सिनेमामधील एका दृष्यासाठी फुलबॉलपटू म्हणून सेटवर आलेल्यांना फुटबॉल सही करुन भेट म्हणून दिले होते.

विजयने दिलेल्या सोन्याच्या अंगठीचा फोटो पोस्ट करताना एकजण म्हणतो, ‘सिनेमाशी संबंधित असणाऱ्या प्रत्येकाच्या कामाचे कौतुक अशा पद्धतीने केले जाते म्हणून विजय खूपच खास आहे. हे असं करायला दिललदार आणि मोठ्या मनाचं असावं लागतं.’

शुटिंग संपल्यानंतर विजयने दिलेली भेट

रजनी, एमजीआर आणि कमल हसनसारखाच विजय…

टेक्नीकल टीममधील एकाचे ट्विट

आणखीन एक ट्विट

आधी दिले होते फुटबॉल

एटली कुमार याने बिगिल या सिनेमाचे दिग्दर्शन केले आहे. विजयबरोबर या सिनेमामध्ये नयनतारा, जॅकी श्रॉफ, काथीर, डॅनियल बालाजी, योगी बाबू, अर्था अय्यर यासारख्या कलाकारांच्या प्रमुख भूमिका या सिनेमामध्ये पहायला मिळणार आहेत. या सिनेमामध्ये विजयचा डबल रोल असून त्याने वडील आणि मुलगा अशा दोन भूमिका साकारल्या आहेत. ए. आर. रेहमानने सिनेमाला संगीत दिले असून या सिनेमा दिवळीमध्ये तामिळ तसेच तेलगू भाषेत प्रदर्शित होणार आहे.

First Published on August 14, 2019 10:27 am

Web Title: vijay gifts customised bigil gold rings to crew members on the last day of shoot scsg 91
Next Stories
1 …म्हणून जॉनी लिवर यांना झालेला तुरुंगवास?
2 पाकिस्तानमध्ये गाणं मिकाला पडलं महागात; AICWA ने लावला बॅन
3 Good News: ‘तारक मेहता..’मध्ये दयाबेनची होणार वापसी; जेठालालने दिले संकेत
Just Now!
X