04 December 2020

News Flash

प्रसिद्ध अभिनेता विजय राजला पोलिसांनी केली अटक

अभिनेत्रीने केली तक्रार

प्रसिद्ध बॉलिवूड अभिनेता विजय राज याला लैंगिक गैरवर्तणुकीच्या आरोपाखाली अटक करण्यात आली आहे. चित्रपटातील एका अभिनेत्रीने त्याच्यावर छेडछाड केल्याचे आरोप केले आहेत. शिवाय या प्रकरणी तिने पोलीस तक्रार देखील केली. परिणामी गोंधियामधील एका हॉटेलमधून विजला पोलिसांनी अटक केली आहे.

अवश्य पाहा – १४ वर्षांची असताना माझ्यावर लैंगिक अत्याचार झाले; आमिर खानच्या मुलीचा गौप्यस्फोट

अवश्य पाहा – हे १० चित्रपट कधीही लहान मुलांसोबत पाहू नका; कारण…

विजय राज आपला आगामी चित्रपट घेऊन लवकर प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. या आगामी चित्रपटाचं नाव शेरनी असं आहे. या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान त्याने एका अभिनेत्रीसोबत गैरवर्तणुक केली असा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी पोलिसांनी त्याला ताब्यात घेतलं असून सध्या या प्रकरणाची चौकशी सुरु आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 3, 2020 6:42 pm

Web Title: vijay raaz arrested in woman molesting case mppg 94
Next Stories
1 सिद्धार्थ मल्होत्राला कियारा करतेय डेट? अक्षय कुमारच्या इशाऱ्यावरून सुरू झाली चर्चा
2 Video : लॉकडाउननंतर प्रेक्षकांना चित्रपटगृहात आणायचं असेल, तर…
3 काय आहे देवदत्त नागेचे ‘ग्रीन वर्कआऊट’? जाणून घ्या
Just Now!
X