News Flash

हिनाला पाहून फोटोग्राफर्सचा गोंधळ; “तिने वडिलांना गमावलंय आणि तुम्ही..” विकास गुप्ता भडकला

20 एप्रिलला हिना खानच्या वडिलांचं झालं निधन

20 एप्रिलला अभिनेत्री हिना खानच्या वडिलांचं निधन झालं. त्यांच्या राहत्या घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला. हृदय विकाराच्या झटक्याने त्यांचं निधन झालं. यावेळी हिना खान तिच्या कामानिमित्त काश्मीरमध्ये होती. वडिलांच्या निधनाची बातमी समजताच हिना मुंबईला येण्यासाठी निघाली. हिना खान मुंबईला पोहताच पैपराजीने तिच्या भोवती गराडा घातला. बिग बॉसचा स्पर्धक असलेल्या विकास गुप्ताला मात्र ही गोष्ट चांगलीच खटकली आणि त्याने फोटोग्राफर्सची कानउघडणी केली.

विकास गुप्ताने सोशल मीडियावर एक व्हिडीओ शेअर करत संताप व्यक्त केला आहे. हा व्हिडीओ एअरपोर्टवरील असून यात हिना खान तिच्या गाडीकडे जाताना दिसतेय. तिने मास्क आणि गॉगल्स लावले आहेत. हिना खान वाट काढत तिच्या गाडीत बसते. ती तिचा चेहऱा लपवण्याचा पूर्ण प्रयत्न करत आहे. तर फोटोग्राफर फोटो काढण्यासाठी तिचा पाठलाग करताना दिसत आहेत. यावेळी हिना फोटोग्राफर्सना ” प्लिज मला जाऊ द्या” अशी वारंवार विनंती करताना दिसतेय. विकासने हा व्हिडीओ शेअर करत पैपराजींची शाळा घेतली आहे.

विकास त्याच्या पोस्टमध्ये म्हणाला आहे, “कुणीतरी वडिलांना गमावलं आहे आणि तुम्हाला विनंती करत आहे की मला माझ्या कुटुंबाकडे जाऊ द्या. तरीही कुणीतरी चेहऱ्यावर लाईट मार ओरडतंय आणि पैपराजी त्याला अडवतही नाही हिना खानसोबतच्या या असंवेदनशील वागणूकीमुळे अत्यंत निराश आहे. रेस्ट इन पीस अंकल.” असं म्हणत विकासने नाराजी व्यक्त केली आहे.

बिग बॉस फेम अभिनेत्री हिमांशी खुराना हिनेदेखील पैपराजींच्या वागणूकीवर नाराजी व्यक्त केली आहे. ती म्हणाली, ” ज्या व्यक्तीने आपल्य़ा वडिलांना गमावलं आहे तिच्यासोबत मीडियाने संवेदनशीलता दाखवणं गरजेचं आहे. ती प्रेमाने मला जाऊ द्या अशी विनंती करतेय तरी त्यांना कंन्टेट हवाय, लज्जास्पद” अशी प्रतिक्रिया तिने दिली आहे.

वाचा: बिग बी अमिताभ बच्चन यांची नात पुन्हा ट्रोल, ‘त्या’ युजरला नव्या नंदा म्हणाली…

हिनाचं तिच्या वडिलांसोबत घट्ट नात होतं. हिना बऱ्याच वेळा तिच्या वडिलांसोबतचे फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. ती काही दिवसांपूर्वी आई-वडिलांसोबत मालदिवला सुट्ट्यांचा आनंद घेताना दिसली होती. तिने तेथील वडिलांसोबतचे फोटो शेअर केले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2021 12:30 pm

Web Title: vikas gupta angry on paparazzi as they stop hina khan at airport for photo her father passed away last night kpw 89
Next Stories
1 अभिनेता चिरंजीवीची मोठी घोषणा! सिने कर्मचाऱ्यांना देणार मोफत लस
2 एकेकाळी बँकेत ‘हे’ काम करायचे एसीपी प्रद्युमन; शिवाजी साटम यांचा प्रवास
3 पाकिस्तानी रॅपरने आलिया भट्टवर बनवला रॅप, व्हिडिओ पाहून आलिया म्हणाली…
Just Now!
X