News Flash

राखीच्या आईला भेटायला गेला विकास गुप्ता, व्हिडीओ पाहून चाहते भावूक

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

बॉलिवूड अभिनेत्री राखी सावंतची आई जया सावंत या सध्या मुंबईमधील रुग्णालयात कॅन्सरवर उपचार घेत आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि त्याचा भाऊ सोहेल खान राखीच्या मदतीला धावून आले आहेत. दरम्यान अभिनेता विकास गुप्ता देखील राखीच्या आईला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचला आहे.

राखी विकास गुप्ताला भाऊ मानते. बिग बॉस १४च्या घरात विकासने राखी सावंतला पाठिंबा दिला होता. बिग बॉसच्या घरातून बाहेर पडताच विकास राखीच्या आईला भेटण्यासाठी हॉस्पिटलमध्ये पोहोचला आहे. तेथील एक व्हिडीओ त्याने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by Vikas Gupta (@lostboyjourney)

विकासने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर राखीच्या आईसोबतचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तो ‘इतकी छान हेअरस्टाईल तुम्ही ठेवली आहे. halle berryला देखील तुमच्यासमोर लाज वाटेल इतक्या कूल आणि झकास तुम्ही दिसत आहात’ असे बोलताना दिसत आहे.

आणखी वाचा: वडिलांना पाहून धावत जाऊन मारली मिठी, सनीची मुलगी निशाच्या व्हिडीओने जिंकली अनेकांची मने

हा व्हिडीओ शेअर करत त्याने ‘halle berry तू आता बाजूल हो कारण बाल्ड लूकमध्ये कूल अंदाज घेऊन राखी सावंतची आई येत आहे. काकी तुमची प्रकृती लवकरच ठिक होईल’ या आशयाचे कॅप्शन दिले आहे. सध्या विकासचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला आहे. चाहते तो पाहून भावूक झाले आहेत.

राखीची आई संध्या मुंबईमधील हॉस्पिटलमध्ये असून कॅन्सरवर उपचार घेत आहेत. राखीने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर आईचे दोन फोटो शेअर केले होते. हे फोटो शेअर करत तिने, ‘माझ्या आईसाठी प्रार्थना करा. ती कॅन्सरवर उपचार घेत आहे’ या आशयाचे कॅप्शन दिले होते. हा फोटो पाहून चाहते भावूक झाले होते. एका चाहत्याने राखीच्या खासगी आयुष्यात इतक्या अडचणी असूनही ती प्रेक्षकांचे मनोरंजन करत होती असे म्हणत कमेंट केली आहे. बॉलिवूडचा भाईजान सलमान खान आणि त्याचा भाऊ सोहेल खान राखीच्या मदतीला धावून आले आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 2, 2021 5:41 pm

Web Title: vikas gupta cheering rakhi sawant mother before her operation video viral avb 95
Next Stories
1 ‘स्वेटशर्ट रूबीनाकडून भाड्याने घेतले की चोरी केले?’ राहुल वैद्य ट्रोलर्सच्या निशाण्यावर
2 हार्दिक जोशीच्या कुटुंबीयांनी केलं नव्या सदस्याचं स्वागत
3 “ती म्हणजे मला देवानं दिलेलं गिफ्ट आहे”, शक्ती कपूर झाले भावूक
Just Now!
X