News Flash

Video : उत्तम कामगिरी करूनही ‘खतरों के खिलाडी’तून काढल्याने विकास गुप्ता भावूक

या शोमधील आघाडीच्या स्पर्धकांमध्ये विकासचं नाव आवर्जून घेतलं जात होतं.

विकास गुप्ता

छोट्या पडद्यावरील ‘खतरों के खिलाडी -९’ हा लोकप्रिय रिअॅलिटी शो सध्या एका रोमांचक वळणावर येऊन ठेपला आहे. या कार्यक्रमाचा फिनाले काही दिवसांवरच येऊन ठेपला असताना ऐनवेळी या शोमधून विकास गुप्ताला बाहेर पडावं लागलं. मात्र हा खेळ अर्ध्यावर सोडल्याने भावूक झालेल्या विकासने सोशल मीडियाच्या माध्यमातून त्याच्या भावना व्यक्त केल्या आहेत.

‘खतरों के खिलाडी’ हा साहसदृश्यांनी परिपूर्ण असा कार्यक्रम असून यात स्पर्धकांना वेगवेगळ्या प्रकारचे टास्क देण्यात येत असतात. या कार्यक्रमामध्ये विकास गुप्तानेही सहभाग घेतला होता. मात्र प्रकृती अस्वास्थामुळे त्याला हा शो सोडावा लागला. हा शो सोडल्यानंतर त्याने एक इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये तो अत्यंत भावुक झाल्याचं पाहायला मिळत आहे.

This one has an epic clip @varunsood12 @rohitsuchanti06 @iroshniwadhwani I was remembering #Adishakti looking at all ur updates so was practising sadness emotion and @saachivj walked in and got worried that I was crying KKK has been such an amazing adventure . It has been like @playadishakti . I went through almost all the nine emotions here as well . Even though I wasn’t ready for it and yet went ahead to do it . Mums so angry about it . I have to say yes I am glad I did it . Made some amazing friends , did some coolest things . Learnt so much . Made mistakes to learn from and most importantly overcame some fears I never thought I could have. #argentina #khatronkekhiladi #vikasgupta #memories P.S. I am more afraid to meet mum than the pythons in the task .

A post shared by Vikas Gupta (@lostboyjourney) on

या शोमधील आघाडीच्या स्पर्धकांमध्ये विकासचं नाव आवर्जून घेतलं जात होतं. दरम्यान एका टास्कमध्ये विकासच्या खांद्याला दुखापत झाली. मात्र, त्याने ही बाब शोच्या टीमपासून लपवत पेनकिलरचे इंजक्शन घेऊन टास्क खेळत राहिला. परिणामी त्याचं दुखणं वाढलं त्यामुळे त्याच्यावर योग्य उपचार व्हावे यासाठी शोच्या टीमने त्याला या शोमधून बाहेर काढण्याचा निर्णय घेतला. या प्रकारामुळे विकास प्रचंड भावुक झाल्याचं पाहायला मिळालं.

शोमधून बाहेर पडल्यानंतर विकासने एक व्हिडिओ शेअर करत त्याने या शोमधील त्याच्या काही आठवणींना उजाळा दिला आहे.त्याचबरोबर त्याला शेवटपर्यंत हा खेळ खेळायचा होता असंही त्याने यावेळी सांगितल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, काही दिवसापूर्वी या शोच्या सेटवर विकासला एक साप चावला होता. त्यानंतर त्याला डॉक्टरांनी आराम करण्याचा सल्ला दिला होता.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 1:02 pm

Web Title: vikas out of khatron ke khiladi share emotional post
Next Stories
1 शाहिदच्या पत्नीला ट्रोल केल्यामुळे इशान संतापला
2 Book Lovers Day : पुस्तकांच्या सानिध्यात रमली सोनाली
3 Video : राधे माँची मुख्य भूमिका असलेल्या ‘राह दे माँ’ वेब सीरिजचा ट्रेलर पाहिलात का?
Just Now!
X