News Flash

कारगीलमधल्या ‘त्या’ शूरवीराची व्यक्तीरेखा साकारणं माझ्यासाठी आव्हानात्मक

कारगील युद्धातील शहीद मेजर विक्रम बत्रा यांची भूमिका करणं त्याच्यासाठी आव्हानात्मक असल्याचं त्याने नुकतंच म्हटलं आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा

काही वर्षांपूर्वी ‘स्टुडंट ऑफ द इयर’ या चित्रपटातून बॉलिवूडमध्ये प्रवेश करणारा अभिनेता सिद्धार्थ मल्होत्रा सध्या नावाजलेल्या अभिनेत्यांपैकी एक असल्याचं पाहायला मिळतं. ‘स्टुडंट ऑफ द इयर’मध्ये दमदार अभिनय करत प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणारा सिद्धार्थ सध्या वेगवेगळ्या धाटणीच्या भूमिकांना प्राधान्य देताना दिसत आहे. मात्र कारगील युद्धातील शहीद मेजर विक्रम बत्रा यांची भूमिका करणं त्याच्यासाठी आव्हानात्मक असल्याचं त्याने नुकतंच म्हटलं आहे.

सध्या सिद्धार्थ बालजी मोशन अंतर्गत तयार होणाऱ्या चित्रपटामध्ये व्यस्त असून त्याच्याबरोबर अभिनेत्री परिनिती चोप्रा स्क्रिन शेअर करत आहे. या चित्रपटाचं चित्रीकरण पूर्ण झाल्यानंतर तो आगामी चित्रपटाकडे वळणार आहे. त्याचा हा आगामी चित्रपट शहीद मेजर विक्रम बत्रा यांच्या जीवनावर आधारित असल्याचं सांगण्यात येत आहे.सिद्धार्थने या आगामी चित्रपटाविषयी नुकतंच त्याचं मत व्यक्त केलं असून मेजर बत्रा यांची भूमिका वठविणं म्हणजे एक मोठं आव्हान असल्याचं म्हटलं आहे.

‘मेजर बत्रा यांची भूमिका वठवणं हे केवळ माझं काम नाही तर ती माझी जबाबदारी आहे. त्यांमुळे त्यांच्या भूमिकेला न्याय देता यावा यासाठी मी आतापासूनच तयारी सुरु केली आहे. मात्र त्यांच्या भूमिकेला न्याय देणं वाटतं तेवढं सोपं नाही. हे फार आव्हानात्मक आहे. त्यामुळे मला प्रचंड मेहनत करण्याची गरज आहे’, असं तो म्हणाला.

दरम्यान, मेजर बत्रा यांची भूमिका वठविण्यासाठी सिद्धार्थ प्रचंड उत्सुक असला तरी त्याच्यावर मोठ्या प्रमाणावर दडपण आल्याचं पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे या नव्या भूमिकेमुळे सिद्धार्थ चाहत्यांपुढे एका नव्या अंदाजात सादर होणार असून तो या भूमिकेला कसा न्याय देतो हे पाहणं औत्सुक्याचं ठरणार आहे.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 10, 2018 11:36 am

Web Title: vikram batra is the toughest role of my life
Next Stories
1 VIRAL: ‘तख्त’च्या स्टारकास्टमध्ये तैमूर कुठंय, नेटकऱ्यांचा करणला खोचक सवाल
2 अशी आहे मनिषाच्या ‘द बुक ऑफ अनटोल्ड स्टोरी’ची पहिली झलक
3 माझी नक्कल करतेवेळी मर्यादा न ओलांडण्याची ताकीद सोनाक्षीने कपिलला दिली होती- शत्रुघ्न सिन्हा
Just Now!
X