News Flash

इटलीमध्ये अशापद्धतीने सुरु आहे दीपिका-रणवीरच्या लग्नाची लगबग

परीकथेला शोभेल असा त्यांच्या विवाहसोहळा इटलीत १४ आणि १५ नोव्हेंबरला पार पडणार आहे.

लेक किमो मधल्या व्हिला दी बाल्बिआनेलो येथे कोंकणी आणि सिंधी पद्धतीनं विवाहसोहळा होणार आहे.

बॉलिवूडमधली सर्वाधिक लोकप्रिय जोडी दीपिका आणि रणवीर हे दोघंही या आठवड्यात विवाहबंधनात अडकणार आहे. परीकथेला शोभेल असा त्यांच्या विवाहसोहळा इटलीत १४ आणि १५ नोव्हेंबरला पार पडणार आहे. संजय लीला भन्साळी, शाहरुख खान, फराह खानसह काही मोजक्या आणि जिवलग व्यक्तींच्या साक्षीनं हा विवाहसोहळा पार पडणार आहे. यासाठी इटलीत आता तयारीची लगबग सुरू आहे.

लेक किमो मधल्या व्हिला दी बाल्बिआनेलो येथे कोंकणी आणि सिंधी पद्धतीनं विवाहसोहळा होणार आहे. सातशे वर्षे जुना असा हा व्हिला लेक किमो परिसरातला सुंदर व्हिला मानला जातो. इटलीच्या संपन्न इतिहासाच्या खुणा त्यानं आजही जपल्या आहेत. रोमन शैलीचा प्रभाव इथल्या प्रत्येक गोष्टीवर जाणवतो. हा व्हिला पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी असते. मात्र रविवारपासून तो पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. येथे लग्नासाठी कडेकोट सुरक्षा करण्यात आली आहे. काही संकेतस्थळांच्या माहितीनुसार लग्नासाठी लागणाऱ्या सामानाची ने- आण करणाऱ्या गाड्यांनाच केवळ आत जाण्याची परवानगी देण्यात आली आहे. वाहतुकीसाठी वेगळा रस्ता खुला करण्यात आला आहे.

इटलीतल्या या निसर्गसंपन्नतेनं नटलेल्या परिसरानं हॉलिवूडमधल्या अनेक स्टार्सना भुरळ घातली आहे. इथे हॉलिवूडमधल्या अनेक जोडप्यांनी लग्नगाठ बांधली म्हणूनच दीपिका आणि रणवीरनं याच ठिकाणी लग्न करण्याचं ठरवलं आहे. यापूर्वी विराट अनुष्कानं इटलीत लग्न केलं होतं.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on November 12, 2018 10:30 am

Web Title: villa del balbianello get ready to host ranveer singh deepika padukone wedding
Next Stories
1 वयाने लहान असलेल्या बॉयफ्रेंडशी लग्नाबाबत सुश्मिता सेन म्हणते…
2 आणखी एका स्टार किड्सची बॉलिवूडमध्ये एन्ट्री
3 बॉलिवूडच्या ‘ठग्ज…’ची शंभर कोटींची कमाई
Just Now!
X