News Flash

VIDEO: …आणि मला दीपिकाचा ‘बॉयफ्रेंड’ भेटला

भारतीय प्रसारमाध्यमांशी बोलताना विन रणवीर सिंगलाही भेटला

बॉलिवूड स्टार दीपिका पदुकोण तिच्या ‘ट्रिपल एक्सः द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या सिनेमाच्या प्रमोशनमध्ये व्यग्र आहे. तिचा हा पहिलाच हॉलिवूड सिनेमा असल्यामुळे, या सिनेमाच्या प्रसिद्धीसाठी ती शक्य ते सर्व करताना दिसत आहे. १४ जानेवारीला ‘ट्रिपल एक्स’ सिनेमा भारतात प्रदर्शित झाला. भारतात या सिनेमाचे प्रमोशन करण्यासाठी खुद्द सिनेमाचा हिरो हॉलिवूड स्टार विन डिझेल आणि या सिनेमाचा दिग्दर्शक डी. जे. कॅरुसोही आले होते.

यावेळी भारतीय प्रसारमाध्यमांशी बोलताना तो रणवीर सिंगलाही भेटला. एका मुलाखतीत त्याने रणवीरचा उल्लेखही केला. पण तुम्ही म्हणाल यात काय नवीन.. पण त्याने रणवीरचा उल्लेख फक्त अभिनेता रणवीर असा न करता दीपिकाचा बॉयफ्रेंड असा केला. जेव्हा विनने रणवीरबद्दल बोलायला सुरुवात केली तेव्हा दीपिकाच्या चेहऱ्यावरचे भाव सर्व काही सांगून जात होते.

‘ट्रिपल एक्सः द रिटर्न ऑफ झेंडर केज’ या सिनेमात आवर्जून जाणवणारी गोष्ट म्हणजे दीपिकाची खास भारतीय शैलीत इंग्रजी बोलण्याची पद्धत. त्यामुळे भारतीय प्रेक्षक या सिनेमाशी पटकन जोडला जातो. याचे श्रेय अर्थातच दीपिकाला जाते. याशिवाय, हा सिनेमा अॅक्शनपॅक्ड असल्यामुळे यामध्ये दीपिका चाकू चालवताना, ग्रेनेड फेकताना, सहजरित्या बंदुक चालवताना आणि मारामारी करताना दिसते. एकुणच दीपिकाच्या आतापर्यंतच्या सिनेमांपेक्षा ट्रिपल एक्समधील तिचा अंदाज पूर्णपणे वेगळा आहे.

दरम्यान, बॉलिवूड दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांच्या ‘पद्मावती’ या ऐतिहासिक सिनेमाच्या सेटवर अपघाती मृत्यू झालेल्या कामगाराच्या कुटूंबियांना दिग्दर्शक संजय लीला भन्साळी यांनी २३ लाखांची मदत देण्याचा निर्णय घेण्यात आला होता. मृत्यूमूखी पडलेल्या कामगाराची पत्नी त्याची दोन मुले आणि आई यांना समप्रमाणात ही रक्कम देण्यात येणार होती.

मुकेश डाकिया या ३४ वर्षीय कारपेंटरचा ‘पद्मावती’च्या सेटवर मृत्यू झाला होता. तो फिल्मीसिटीत सदर चित्रपटाच्या सेटवर काम करत होता. काम करत असताना मुकेश पाच फूटाच्या उंचीवरून खाली कोसळला आणि त्याच्या डोक्याला मार लागला. कोकिलाबेन रुग्णालयात नेले असता डॉक्टरांनी मुकेश यांना मृत घोषित केले होते. या अपघातासंदर्भात आरे पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली होती. संजय लीला भन्साळी यांनी अपघातात मृत्यू झालेल्या मुकेशच्या कुटुंबियांना आर्थिक मदत देऊ केली असल्याचे वृत्त ‘दि इंडियन एक्स्प्रेस’ने दिले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 14, 2017 7:03 pm

Web Title: vin diesel refers to ranveer as deepika padukone boyfriend
Next Stories
1 करण- काजोलच्या वादात आता अजय देवगणही
2 .. या मतदार संघातून सनी लिओनी लढवणार निवडणूक?
3 आता ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन शिकवणार कतरिना
Just Now!
X