करोना विषाणूमुळे सध्या संपूर्ण जगातील लोक त्रस्त आहेत. लोकांचं जनजीवन पार विस्कळीत झालं आहे. जगभरातील हजारो कुटुंबियांनी आपल्या घरातील लोकांना गमावले आहे. या करोनावर लोक आता संतापले आहेत. परंतु विन डिझलच्या मुलाला मात्र करोनाबाबत कुठलाही राग नाही. उलट करोनाने लोकांची मदतच केली, असे आवाक् करणारे वक्तव्य त्याने केले आहे.

काय म्हणाला विन डिझलचा मुलगा?

हॉलिवूड अभिनेता विन डिझल याने नुकताच एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर पोस्ट केला आहे. या व्हिडीओमध्ये तो आपल्या मुलासोबत दिसत आहे. तुला करोना व्हायरसबाबत काय वाटते? असा प्रश्न विनने आपल्या मुलाला विचारला. यावर विन्सचा मुलगा विंसेंट सिंक्लेयर म्हणतो,…

 

View this post on Instagram

 

Our Global Family… #leadwithlove

A post shared by Vin Diesel (@vindiesel) on

“करोनाने आपल्याला जितका त्रास दिला त्यापेक्षा अधिक आपली मदत केली आहे. करोनामुळे आज आपण ग्लोबल फॅमिली म्हणजेच एक जागतीक कुटुंब झालो आहोत. आपण रंग, रुप, भाषा, संस्कृती यांचा विचार न करता एकमेकांवर विश्वास ठेवायला शिकलो आहोत. आपण एकमेकांची मदत करत आहोत. करोना व्हायरसने आपल्याला एकत्र केले. आज ना उद्या या विषाणूवर औषध नक्की तयार केलं जाईल. सर्व काही ठिक हईल अशी मला खात्री आहे.”

करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर विन डिझलने शेअर केलेला हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार चर्चेत आहे. काही तासांत शेकडो नेटकऱ्यांनी यावर आपल्या प्रतिक्रिया आहेत. अनेकांनी विनच्या मुलाचे तोंड भरुन कौतुक देखील केले आहे.