05 June 2020

News Flash

ही होती रामायणातील हनुमानाची भूमिका साकारणाऱ्या दारा सिंह यांची शेवटची इच्छा

दारा सिंह यांचा मृत्यू १२ जुलै २०१२ रोजी झाला

लॉकडाउनच्या काळात ८०च्या दशकातील रामानंद सागर यांची लोकप्रिय मालिका ‘रामायण’ पुन्हा दाखवण्याची मागणी केली होती. त्या मागणीनुसार २८ मार्चपासून सकाळी ९ आणि रात्री ९ असे दिवसातून दोन वेळा ‘रामायण’ मालिकेचे प्रसारण करण्यात येत आहे. ही मालिका ऑन-एअर येताच या मालिकेने टीआरपीचे सारे विक्रम मोडीत काढले. मालिकेत प्रभू रामांची भूमिका अरुण गोविल यांनी साकारली होती तर सीतेची भूमिका दीपिका चिखलियाने. तसेच हनुमानाची भूमिका दारा सिंह यांनी साकारली. त्यांची हुनमानाची भूमिका त्यावेळी विशेष गाजली होती. पण आज पुन्हा रामायण पाहण्यासाठी दारा सिंह आपल्यामध्ये नाहीत.

नुकताच दारा सिंह यांचा मुलगा विंदू सिंहने एका वृत्तवाहिनीला मुलाखत दिली. दरम्यान त्याने दारा सिंह यांची शेवटची इच्छा काय होती हे सांगितले आहे. ‘माझ्या वडिलांनी त्यांच्या शेवटच्या दिवसांमध्ये रामायण पुन्हा पाहण्याची इच्छा व्यक्त केली होती. ते जेव्हा रामायण पाहायचे तेव्हा एकाच वेळी पाच एपिसोड पाहायचे’ असे विंदू म्हणाले.

‘माझ्या वडिलांनी त्यांच्या करिअरमध्ये तीन वेळा हनुमानाची भूमिका साकारली होती. १९७६ मध्ये प्रदर्शित झालेल्या “जय बजरंग बली” या चित्रपटात हनुमानाची भूमिका साकारली होती. त्यानंतर रामानंद सागर यांच्या रामायण मालिकेत हुनमानाची भूमिका साकारली आणि तिसरी भूमिका बी आर चोपडा यांच्या महाभारतात हनुमानाची भूमिका साकारली. माझ्या वडिलांनंतर अनेकांनी हनुमानाची भूमिका साकारली पण त्यांची जागा कोणी घेऊ शकले नाही’ असे विंदू पुढे म्हणाले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 8, 2020 2:23 pm

Web Title: vindu dara singh reveal father dara singh last wish avb 95
Next Stories
1 ‘रामा’चं ट्विटरवर फेक अकाऊंट; खुद्द मोदीही फसले
2 Video : 90 च्या दशकातील ‘या’ जाहिरातींची पुन्हा चर्चा; तुम्हाला आठवतात का?
3 एकताच्या महाभारताप्रमाणे शक्तिमानच्या सिक्वेलचा मर्डर होऊ देणार नाही, मुकेश खन्ना यांचा एकतावर निशाणा
Just Now!
X