हिंदी चित्रपटसृष्टीत दिवंगत अभिनेते विनोद खन्ना यांच्या पत्नी गीतांजली यांचे  हृदयविकाराने निधन झाले आहे. वयाच्या ७० व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला.  अलिबाग येथील मांडवा येथे त्यांच्या राहत्या घरीच त्यांनी अखेरचा श्वास घेतला. आज रविवारी सकाळी त्यांचे पार्थिव जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी आणण्यात आले. यावेळी अभिनेता अक्षय खन्ना व राहुल खन्ना हे दोन्ही मुले उपस्थित होते. गीतांजली यांच्या पार्थिवावर मांडवा येथे  अंत्यसंस्कार होणार आहेत.  गेल्यावर्षी विनोद खन्ना यांचे निधन झाले होते. आणि आता गीताजंली यांचे निधन झाले आहे. अक्षय खन्ना व राहुल खन्नावरून आई आणि वडील असं दोघांचही छत्र हरपलं आहे.