News Flash

भाऊ कदम यांचे ‘व्हीआयपी गाढव’

चित्रपटाची कथा डॉ. रणजीत सत्रे यांची तर पटकथा डॉ. प्रसन्न देवचके यांची आहे.

‘नशीबवान’ या चित्रपटानंतर कल्पराज क्रिएशन प्रस्तुत, डॉ. रणजीत सत्रे आणि डॉ. प्रसन्न देवचके निर्मित आणि संजय पाटील दिग्दर्शित ‘व्हीआयपी गाढव’ या चित्रपटात अभिनेते भाऊ  कदम मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. या चित्रपटाचे पोस्टर नुकतेच समाजमाध्यमांवर प्रदर्शित झाले आहे.

ग्रामीण बाज, ठसकेबाज भाषा आणि दादा कोंडके शैली या तिघांचा मेळ असलेला ‘व्हीआयपी गाढव’ चित्रपट म्हणजे विनोदाची धमाल असणार आहे. चित्रपटाची कथा डॉ. रणजीत सत्रे यांची तर पटकथा डॉ. प्रसन्न देवचके यांची आहे. चित्रपटात चार गाणी असून चित्रपटाचे संगीत अशोक वायंगणकर यांचे तर गीतरचना मोमीन कवठेकर यांची आहे.

चित्रपटाचे संपूर्ण चित्रीकरण अहमदनगर जिल्ह्यातील छोटय़ा गावांमध्ये झाले आहे. चित्रपटाचे नावच विनोदी असून चित्रपटात शीतल अहिरराव, भारत गणेशपुरे, विजय पाटकर, पूजा कासेकर, शरद जाधव, शिल्पी अवस्थी हे अन्य कलाकार आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 11, 2019 1:34 am

Web Title: vip gadhav bhau kadam mpg 94
Next Stories
1 कालप्रवासाचा थरार
2 मृत्यूची सावली दूर सारताना
3 उमेश आणि प्रिया म्हणतात, ‘आणि काय हवं!’
Just Now!
X