News Flash

Viral: चेल्लम सरांनंतर आता ‘द फॅमिली मॅन २’ मधील ‘संबित’चे मीम्स व्हायरल, चहाच्या सीन्सची चर्चा

चेल्लम सर यांच्या नंतर आता विपिन शर्मा यांच्या चहाचे सीन्स सध्या व्हायरल होतोय. विपिन शर्मा म्हणाले, "या सीन्समध्ये कोणताही शब्द वापरलेला नाही...."

बॉलीवूड अभिनेता मनोज वाजपेयी, अभिनेत्री समांथा अक्किनेनी आणि प्रियामनी स्टारर वेब सीरिज ‘द फॅमिली मॅन २’ नुकतीच अ‍ॅमेझॉन प्राइम व्हिडीओवर स्ट्रीम करण्यात आली आहे. या सीरिजला आणि त्यातील कलाकारांना प्रेक्षक मोठ्या प्रमाणात पंसती देत आहेत. अनेक चित्रपट समिक्षकांनी सुद्धा या सीरिजचं कौतुक केलंय. सीरिजमधल्या कलाकारांनी प्रेक्षकांवर आपल्या अभिनयाची भुरळ घातली आहे. चेल्लम सर यांच्या नंतर आता अभिनेता विपीन शर्मा यांच्या चहाचा सीक्वेन्स सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतोय.

‘द फॅमिली मॅन’ या सीरिजमध्ये अभिनेता विपिन शर्मा यांनी ‘संबित’ नावाच्या व्यक्तीची भूमिका साकारली आहे. संबित यांच्या आयुष्यात बऱ्याच अडचणींचा चढ-उतार असलेला दाखवण्यात आलाय. ते देशाचा कारभार पाहत असतात. पण सोबत देशाच्या पंतप्रधानाला सुद्धा सांभाळण्याची जबाबदारी त्यांच्या डोक्यावर असते. कित्येक विभागाचे कामकाज देखील त्यांना पहावे लागतात. या सगळ्यात अभिनेता विपिन शर्मा यांचे चहाचे छोटे-छोटे सीन्स पहायला मिळतात. संपूर्ण सीरिजमध्ये अभिनेता विपिन शर्मा यांचे चहाचे हे सीक्वेन्स या सीरिजचे हायलाईट्स ठरले आहेत. हे चहाचे सीक्वेन्स सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. अभिनेता विपिन शर्माच्या चहाच्या सीक्वेन्सचे अनेक मीम्स देखील व्हायरल होत आहेत.

इथे पहा चहाच्या सीक्वेन्सचे मीम्स :

अभिनेता विपिन शर्मा यांनी नुकतंच एका माध्यमाला मुलाखत दिलीय. माध्यमाशी बोलताना त्यांनी या व्हायरल होत असलेल्या चहाच्या सीक्वेन्सवर आपली प्रतिक्रिया दिलीय. सीरिजमधले हे चहाचे सीक्वेन्स इतके व्हायरल होतील, याचा विचार देखील केला नव्हता, असं यावेळी विपिन शर्मा म्हणाले. सीरिजची शूटिंग सुरू असताना हा एक विचित्र सीन आहे, असं मला त्यावेळी वाटलं होतं. जेव्हा मी राज आणि डीके यांना भेटलो, त्यावेळी त्यांनीही मला हेच सांगितलं. त्यानंतर मला यात काहीतरी इंटरेस्टिंग आहे हे समजलं होतं. पण चहाचे हे सीक्वेन्स इतक्या वरच्या पातळीपर्यंत पोहोचतील, असं वाटलं नव्हतं. हे सीन्स शूट करताना केवळ प्रामाणिकपणाने पूर्ण करण्याचा प्रयत्न केला. पण हे सीन्स इतके हिट होतील, याचा विचार देखील मनात आला नव्हता. आता सध्या हा सीन व्हायरल होताना पाहून आनंद होतोय.

या सीरिजमधल्या चहा-बिस्कीटच्या सीक्वेन्सवर बोलताना अभिनेता विपिन शर्मा म्हणाले, “या सीन्समध्ये कोणताही शब्द वापरलेला नाही. पण तरीही चेहऱ्यावरील केवळ हावभावाच्या आधारे अभिनय करण्याचा प्रयत्न केला आहे. आपल्या समोर असलेला कॅमेरा आपल्या आत्म्याला वाचत असतो. म्हणूनच मला स्टिल फोटोग्राफीची सुद्धा भिती वाटते. कारण कॅमेरा आपल्यातल्या प्रामाणिकपणाला खूप खोलवर कॅप्चर करत असतो. म्हणूनच एक अभिनेता या नात्याने प्रामाणिक राहणं खूप अवघड असतं. अभिनय करणं खूप सोप्पं वाटतं, पण ते खूपच आव्हानात्मक आहे. चहाच्या सीक्वेन्समधून जे चांगलं आहे ते लोकांपर्यंत पोहोचलंय ते पाहून खूप आनंद होतोय.”

सध्या ‘द फॅमिली मॅन २’ ही सीरिज सोशल मीडियावर हिट ठरतेय. सीरिजमध्ये फार थोड्या कालावधीसाठी दिसलेल्या कलाकारांची लोकप्रियता दिवसेंदिवस वाढतच आहे. चिल्लम सर यांच्या नंतर आता सीरिजमधले ‘संबित’ यांची सोशल मीडियावर जोरदार चर्चा सुरूय.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 13, 2021 2:36 pm

Web Title: vipin sharma chai sequence viral on social media family man 2 prp 93
Next Stories
1 बर्थ डे गर्ल दिशा पटानीच्या पहिल्या ऑडिशनचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल
2 “असं वाटतं तू कायमच गरोदर असतेस”, ट्रोल करणाऱ्या युजरची लिसा हेडनने केली बोलती बंद
3 सनी लिओनीने पतीसह ‘लंदन ठुमकदा’ गाण्यावर लावले ठूमके; व्हिडीओ होतोय व्हायरल
Just Now!
X