स्टॅण्डअप कॉमेडिअन वीर दास सध्या सोशल मीडियावर प्रचंड चर्चेत आहे. “आपल्या देशात व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य नाही.” असं चकित करणार विधान त्याने केलं आहे. त्याच्या ‘हसमुख’ या वेब सीरिजवर सध्या दिल्ली उच्च न्यायालयात खटला सुरु आहे. या प्रकरणामुळे वैतागलेल्या वीर दासने आपला राग व्यक्त करण्यासाठी एक इन्स्टा पोस्ट लिहिली आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

अवश्य पाहा – तुफान व्हायरल होणारं ‘हे’ भोजपुरी गाणं तुम्ही पाहिलंय का?

काय म्हणाला वीर दास?

“एक मजेशीर गोष्ट आहे. २०२० च्या सुरुवातीपासून आतापर्यंत मला १३ लीगल नोटिस मिळाल्या आहेत. माझ्या विनोदांवर न्यायालयात खटला सुरु आहे. होय, मी केलेल्या विनोदांवर खटला सुरु आहे. वकील, फीस, मिटिंग आणि वेळ, खरंच मी वैतागलो आहे. व्यक्त होण्याचं स्वातंत्र्य आहे पण ते स्वातंत्र्य अस्तित्वात नाही.” अशा आशयाची इन्स्टा पोस्ट त्याने लिहिली आहे. वीर दासची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर चर्चेत आहे.

अवश्य पाहा – “आओ हंसते-हंसते, जाओ हंसते-हंसते”; जगदीप यांचा थ्रोबॅक व्हिडीओ व्हायरल…

 

View this post on Instagram

 

Fun

A post shared by Vir Das (@virdas) on

हसमुख वेब सीरिजचं प्रकरण काय आहे?

‘हसमुख’ या सीरिजमधून देशातील गुन्हेगारी विश्व उलगडण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. तसेच यामध्ये काही प्रमाणात न्यायालयीन कामकाजात केला जाणारा भ्रष्टाचार देखील दाखवण्यात आला आहे. मात्र या कथानकावर काही जण नाराज आहेत. वकिली व्यवसायाला बदनाम करण्याचा हा कट असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. शिवाय या सीरिजवर बंदी घालण्यासाठी त्यांनी कोर्टात याचिका देखील दाखल केली आहे.