रेल्वे स्थानकांवर गाणे गाऊन उदरनिर्वाह करणाऱ्या रानू मंडल यांचा सोशल मीडियावर गाणं गाताना व्हिडीओ व्हायरल झाला होता. या व्हिडीओमधून रातोरात गायिका झालेल्या रानू मंडल यांना बॉलिवूड अभिनेत हिमेश रेशमियाने त्याच्या आगमी चित्रपटात गाण्याची संधी दिली. या एका गाण्यासाठी मंडल यांना हिमेशने जवळपास सहा ते सात लाख रुपयांचे मानधन दिले. मात्र नेटकऱ्यांनी रानू यांच्यावर निशाणा साधला आहे.

हिमेश रेशमियाचा लवकरच ‘हॅप्पी हार्डी अॅन्ड हीर’ हा चित्रपट येणार आहे. या चित्रपटासाठी रानू मंडलने ‘तेरी मेरी कहानी’ हे गाणे गायले आहे. हे गाणे रेकॉर्ड करतानाचा रानूचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला. आता नेटकऱ्यांनी त्यांच्या गाण्यावरुन मीम्स आणि टिक-टॉक व्हिडीओची लाट पसरली आहे. चला पाहूया व्हायरल झालेले मीम्स…

रानू या मुळच्या मुंबईमध्ये राहणाऱ्या. पतीच्या मृत्यूनंतर उदरनिर्वाह करण्यासाठी रानू वेगवेगळ्या रेल्वे स्टेशनवर गाणे गात असे. त्या रेल्वेमध्ये गाणे गात कोलकात्याला पोहोचल्या आणि कोलकाताच्या रानाघाट स्टेशनवर गाणी गाऊन आपल्या जीवनाचा गाडा चालू लागल्या. तेथे त्यांना अतिंद्र चक्रवर्ती हा तरुण भेटला. पेशाने इंजीनिअर असलेल्या अतिंद्रने रानू यांचा सुरेल आवाज ऐकला आणि त्यांचा व्हिडीओ रेकॉर्ड करून सोशल मीडियावर पोस्ट केला. हा व्हिडीओ व्हायरल झाल्यावर रानू यांना मुंबईत घेऊन येणारा व्यक्तीसुद्धा हाच आहे. त्यांना गायनाची संधी देणाऱ्या हिमेशचे अतिंद्रने आभार मानले आहेत.