News Flash

जॅकलीन फर्नांडिसचे सिजलिंग फोटोशूट व्हायरल; चाहते झाले घायाळ

अवघ्या काही तासांत ९ लाखांपेक्षा जास्त लाइक्स

दिलखेचक अदा आणि उत्तम अभिनयशैली यांच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवणारी अभिनेत्री म्हणजे जॅकलीन फर्नांडिस. सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या जॅकलीनने नुकतंच तिचे सिजलिंग पोजमधील फोटो शेअर केल्याने पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. तिचे हे फोटोज सध्या सोशल मिडीयावर मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत. या फोटोजमधील जॅकलीनचा अंदाज पाहून तिचे फॅन्स देखील घायाळ झाले आहेत.

अभिनेत्री जॅकलीन फर्नांडिसने तिच्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून हे फोटोज शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये ती एका पेक्षा एक सिजलिंग पोज देताना दिसून आली. जॅकलीन घरात फरशीवर बसलेली आहे आणि तिने प्रिंटेड वनपीस ड्रेस परिधान केलाय. तिच्या बाजूला एक सुंदर पेटिंग देखील ठेवण्यात आली आहे. हे फोटोज शेअर करताना तिने एक कॅप्शन देखील लिहिली आहे. यात तिने लिहिलंय, “तुम्ही कोणत्याही गोष्टींतून वर येऊ शकता.” जॅकलीनच्या या फोटोंना तिच्या फॅन्सकडून मोठ्या प्रमाणात पसंती मिळतेय. हे फोटो शेअर करून काही तासच झाले आहेत तरी आतापर्यत एकूण ९ लाखांपेक्षा जास्त लाइक्स मिळाले आहेत.

हे फोटो शेअर करताना जॅकलीनने रेड हार्ट इमोजी आणि फ्लेक्सिंग बाइसेप ईमोजीचा वापर केलाय. सकारात्मक विचार आणि सगळ्यांशी आदराने वागण्याच्या स्वभाव यामुळे ती लाखो चाहत्यांची आवडती अभिनेत्री झाली आहे. जॅकलीनचे इन्स्टाग्रामवर ५१ मिलियन पेक्षा जास्त फॉलोअर्स आहेत. दुसरीकडे जॅकलीनच्या चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंट्स करत कौतुकाचा वर्षाव केला आहे.

जॅकलीनच्या वर्कफ्रंट बद्द्ल बोलायचं झालं तर लवकरच ती अभिनेता अक्षय कुमारसोबत ‘बच्चन पांडे’ चित्रपटात दिसणार आहे. या चित्रपटात अक्षय कुमार आणि जॅकलीन व्यतिरिक्त कृति सेनन, पंकज त्रिपाठी आणि अरशद वारसी यांच्या देखील महत्त्वाच्या भूमिका आहेत. तसंच रोहित शेट्टी दिग्दर्शित ‘सर्कस’ या चित्रपटात ती अभिनेता रणवीर सिंहसोबत झळकणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 25, 2021 9:21 pm

Web Title: viral news jacqueline fernandez shared latest sizzling and mesmerizing photoshoot prp 93
Next Stories
1 तमाशा रंगभूमीवरील अस्सल लोककलावंत कांताबाई सातारकर यांचं निधन
2 धर्मेंद्र यांचा नातू करण देओलने सावत्र आजी हेमा मालिनीचं केलं कौतुक; म्हणाला, “एक शानदार अभिनेत्री”
3 ‘शाहरुखसोबत बीडी शेअर करायचो’, मनोज वाजपेयीने सांगितला किस्सा
Just Now!
X