News Flash

रिया चक्रवर्ती पुन्हा चर्चेत; नवा फोटो होतोय व्हायरल

काही काळाच्या शांततेनंतर रिया पुन्हा सोशल मीडियावर चर्चेचा विषय

अभिनेता सुशांतसिंह राजपूत याच्या आत्महत्येनंतर चर्चेत आलेली अभिनेत्री म्हणजे रिया चक्रवर्ती. रिया या काळात सोशल मीडियावरही प्रचंड चर्चेचा विषय ठरली होती. मध्यंतरी काही काळ या चर्चेला विराम मिळाला होता. पण आता पुन्हा तिच्यबद्दल चर्चा सुरु झाल्या आहेत. ती काल संध्याकाळी मुंबई विमानतळावर दिसली. तेव्हा तिने घातलेल्या शर्टमुळे या चर्चा सुरु झाल्या आहेत.

रिया काल संध्याकाळी मुंबई विमानतळावर दिसली, त्यावेळी ती तिचा भाऊ शौविक आणि वडील इंद्रजित चक्रवर्ती यांच्यासोबत होती. तिने पांढऱ्या रंगाचा हुडी घातला होता. त्या हुडीवर ‘मॅन अप’ असं लिहिलं होतं. काही मनोरंजन वेबसाईट्सने तिचे फोटो आणि व्हिडिओज सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by Viral Bhayani (@viralbhayani)

अशा पद्धतीची वाक्यं लिहिलेला शर्ट तिने यापूर्वीही घातला होता. गेल्या वर्षीच्या सप्टेंबरमधला तिचा टी-शर्टही त्यावर लिहिलेल्या वाक्यामुळं चर्चेत आला होता. हा तिचा फोटो सोशल मीडियावर बराच व्हायरल झाला होता आणि नेटिझन्सनी त्यावर टीकाटिप्पणीही केली होती. काळ्या रंगाच्या त्या टी-शर्टवर “Roses are red, violets are blue, Let’s smash patriarchy, Me and you”, असं वाक्य लिहिलं होतं. तुम्ही आम्ही मिळून पुरुषप्रधान संस्कृती संपवूया, अशा आशयाचं ते वाक्य होतं.

 

View this post on Instagram

 

A post shared by Simply Bollywood (@simplybollywud)

सुशांतचा मृत्यू झाल्यापासून रिया सोशल मीडियावर फारशी ऍक्टीव्ह नाही. रुमी जाफरी याच्या ‘चेहरे’ या आगामी चित्रपटातून अमिताभ बच्चन, इमरान हाश्मी यांच्यासोबत ती मोठ्या पडद्यावर दिसणार होती. पण, नुकतंच या सिनेमाचं पोस्ट रिलीज झाल्यावर त्यात मात्र रिया कुठेच दिसली नाही.

सुशांत सिंग राजपूत याच्या आत्महत्येनंतर रिया चर्चेत आली होती. त्याच्या मृत्यूशी संबंधित ड्रग्ज प्रकरणी तिला अंमली पदार्थ विभागानं ताब्यातही घेतलं होतं. एक महिन्यानंतर तिची जामिनावर मुक्तता करण्यात आली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 1, 2021 12:08 pm

Web Title: viral photos of rhea chakraborty spotted with a hoodie vsk 98
Next Stories
1 शनाया कपूरच्या बेली डान्सचा जलवा, व्हिडीओ पाहून चाहते घायाळ
2 विरूष्कानंतर सैफ-करीनाने घेतला बाळासाठी महत्त्वाचा निर्णय?
3 78 व्या गोल्डन ग्लोब पुरस्कारांचा व्हर्च्युअल सोहळा, कुणी कोरलं पुरस्कारांवर नाव?
Just Now!
X