22 September 2020

News Flash

अभिनेत्रीला क्वारंटाइन केंद्रातच वाटतेय करोनाची भीती, केला व्हिडीओ शेअर

हा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे

देशभरात सध्या लॉकडाउनचा चौथा टप्पा सुरू झाला आहे. अशातच बॉलिवूड अभिनेत्री पूजा बेदी काही दिवसांपूर्वीच होणारा पती मानेकसोबत गोव्याला गेली होती. तेथे पोहोचल्यावर तिला क्वारंटाइन करण्यात आले. पण तेथे तिला अनेक समस्यांचा सामना करावा लागत असल्याचे तिने सोशल मीडिया पोस्टद्वारे सांगितले आहे. पूजाने तिला क्वारंटाइन केलेल्या रुमचा व्हिडीओ शेअर केला आहे.

पूजा बेदीने तिच्या ट्विटर अकाऊंटवर हा व्हिडीओ शेअर केला आहे. हा व्हिडीओ शेअर करत तिने ‘गेल्या काही दिवसांपासून मी माझ्या होणाऱ्या नवऱ्यासोबत गोव्याला आल्यामुळे सोशल मीडियावर चर्चा सुरु आहेत. आम्ही सर्व बुकिंग केल्यावरच गोव्याला आलो आहोत. आम्ही गोव्याचे सरकार आणि डीसीपी मुंबई दोन्हीकडे ऑनलाइन नोंदणी केली होती. दरम्यान प्रत्येक चेकपोस्टवर आम्हाला थांबवण्यात आले होते. इथे आल्यावर आमची कोराना चाचणी करण्यात आली आणि एक रात्र आम्ही क्वारंटाइन सेंटरमध्ये घालवली. पण इथल्या सुविधांमुळे मला का त्रास झाला हे व्हिडीओ पाहिल्यावर तुम्हालाही कळेल’ असे तिने कॅप्शन दिले आहे.

पूजाने शेअर केलेल्या व्हिडीओमध्ये तिला क्वारंटाइन केलेल्या रुमचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये तिने तेथील बेडवर असलेली उशी किती मळलेली आहे हे दाखवले आहे. तसेच तेथील टीव्ही आणि सेटअप बॉक्सवर धूळ असल्याचे देखील दाखवले आहे. शिवाय तिथल्या बाथरुमची काय आवस्था आहे हे देखील सांगितले आहे. अशी अस्वच्छता असल्यामुळे इथे येऊन लोकांना करोनाचे संक्रमण होई शकते असे तिने व्हिडीओमध्ये म्हटले आहे. सध्या तिचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 20, 2020 8:19 pm

Web Title: viral social pooja bedi reveals quarantine facility of goa says people may get coronavirus here avb 95
Next Stories
1 गायक उत्कर्ष शिंदेचं सामाजिक भान; कला क्षेत्रातील गरजू कुटुंबांना केलं रेशन वाटप
2 मनोरंजनसृष्टीने सोडला सुटकेचा निश्वास; मुख्यमंत्र्यांनी मागण्यांसंदर्भात केल्या सूचना
3 Video: फोनवर बोलण्यात गुंग असणाऱ्या गायकाच्या हातात गर्लफ्रेंडने ठेवला साप
Just Now!
X