19 March 2019

News Flash

प्रिया वारियरला बॉलिवूडची लॉटरी, ‘या’ अभिनेत्यासोबत करणार स्क्रीन शेअर?

अवघ्या काही सेकंदांच्या एका व्हिडिओमुळे प्रियाच्या वाट्याला हे यश आलं

प्रिया वारियर

काही दिवसांपूर्वीच ‘उरु अदार लव्ह’ या मल्याळम चित्रपटातील ‘मानिक्य मलरया पूवी’ या गाण्यामुळे प्रिया प्रकाश वारियर हे नाव अनेकांच्या मनात घर करुन गेलं. चित्रपटसृष्टीत पदार्पण करण्यापूर्वी प्रिया वारियरला प्रसिद्धी, चाहत्यांचं प्रेम, सोशल मीडियावर सर्वाधिक असंख्य फॉलोअर्स या सर्व गोष्टींचा अनुभव घेता आला. अवघ्या काही सेकंदांच्या एका व्हिडिओमुळे प्रियाच्या वाट्याला हे यश आलं. त्यातच आता आणखी एका गोष्टीची भर पडली आहे. मुळात ही गोष्ट प्रियाच्या अभिनय कारकिर्दीला कलाटणी देणारी ठरु शकते. कारण, प्रियाने बॉलिवूडमधील काही प्रसिद्ध व्यक्तींचं लक्ष वेधलं असून, त्यातीलच एक नाव आहे करण जोहरचं.

वाचा : इन्स्टाग्राम पोस्टमधून प्रिया वारियरची जबरदस्त कमाई

‘डेक्कन क्रॉनिकल’ने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार रोहित शेट्टीच्या आगामी ‘सिम्बा’ या चित्रपटासाठी प्रियाची निवड करण्यात आली आहे. या चित्रपटातून ती अभिनेता रणवीर सिंगसोबत स्क्रीन शेअर करणार आहे. या चित्रपटात तिची एक लहान भूमिका असल्याचं कळत आहे. मुख्य म्हणजे, प्रियाची भूमिका लहान असली तरीही करण जोहरने तिच्या कामाची दखल घेणं आणि तिला ही महत्त्वाची संधी मिळणं याचा प्रियाच्या कारकिर्दीला बराच फायदा होणार आहे, असं अनेकांचच मत आहे.

वाचा : ‘व्हायरल’ची गंभीर साथ!

अॅक्शन चित्रपटांसाठी ओळखला जाणारा रोहित शेट्टी ‘सिम्बा’चं दिग्दर्शन करणार असून, करण जोहर या चित्रपटाचा निर्माता आहे. या चित्रपटातून अभिनेता रणवीर सिंग मुख्य भूमिकेत झळकणार असून, ‘संग्राम भालेराव’ म्हणजेच ‘सिम्बा’ हे पात्र रंगवणार आहे. तेव्हा आता प्रिया या चित्रपटात नेमकी कोणती भूमिका साकारणार आणि त्याचा प्रियाला किती फायदा होणार हे येत्या काळात ठरेल असंच म्हणावं लागेल.

First Published on March 14, 2018 3:04 pm

Web Title: viral song manikya malaraya poovi fame malayalam actress priya prakash varrier to share screen space with bollywood actor ranveer singh in rohit shettys simmba