News Flash

Viral Video: हॉलिवूडच्या सुपरहिरोंनी धरला बॉलिवूडच्या गाण्यावर ठेका

व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

माव्‍‌र्हल सिनेमॅटिक युनिव्हर्सचा ‘अ‍ॅव्हेंजर्स एंडगेम’ हा सुपरहिरोपट २०१९ मधील सर्वात सुपरहिट चित्रपट ठरला. या चित्रपटाने जगभरातून तब्बल २८९.८ कोटी अमेरिकी डॉलर्सची कमाई केली होती. परंतु या चित्रपटाचे दिग्दर्शन समजा प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता करण जोहर याने केले असते, तर ‘अ‍ॅव्हेंजर्स’ कसे दिसले असते? याचा एक व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

घडल असं की, ‘सनी’नं मागितली ‘सनी’ची माफी

बॉलिवूड गुड्डू या ट्विटर हँडलवरुन पोस्ट केलेला एक व्हिडीओ करणने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. या व्हिडीओत ‘अ‍ॅव्हेंजर्स’मध्ये झळकलेल्या स्पायडरमॅन, हल्क, आयर्नमॅन, थॉर, कॅप्टन अमेरिका या लोकप्रिय सुपरहिरोंच्या गेटअपमध्ये काही डान्सर्स डान्स करताना दिसत आहेत. गंमतीशीर बाब म्हणजे ही मंडळी करण जोहरच्या ‘स्टुडन्ट ऑफ द इअर’ या चित्रपटातील ‘डिस्को दिवाने’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत.

३५ वर्षानंतर रजनीकांत-कमल हासन येणार एकत्र

या व्हिडीओवर नेटकऱ्यांनी दिलेल्या प्रतिक्रिया

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 8, 2019 2:26 pm

Web Title: viral video avengers crew dance to bollywood song disco deewane mppg 94
Next Stories
1 घडल असं की, ‘सनी’नं मागितली ‘सनी’ची माफी
2 …म्हणून शर्मिला यांचे बिकिनी पोस्टर एका रात्री उतरवण्यात आले
3 ३५ वर्षानंतर रजनीकांत-कमल हासन येणार एकत्र
Just Now!
X