बॉलिवूड अभिनेत्री मिनी माथुर सध्या सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असल्याचे पाहायला मिळते. ती सतत व्हिडीओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करताना दिसत आहे. नुकताच तिने शेअर केलेला एक व्हिडीओ चर्चेत आहे. हा मजेशील व्हिडीओ पाहून तुम्हालाही हसू येईल.

मिनी माथुरने तिच्या ट्विटर अकाऊंटवर एका गावात राहणाऱ्या बहिण-भावाचा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते दोघे मजेशीर अंदाजात डान्स करताना दिसत आहेत. हा व्हिडीओ शेअर करत तिने हो! सकाळी उठल्याउठल्या अशा सकारात्मक गोष्टी पाहण्याची मला गरज होती अशा अशयाचे कॅप्शन तिने दिले आहे.

sundara manamadhe bharli akshaya naik
“जेवढ्या लोकांनी हिणवलं…”, ‘सुंदरा मनामध्ये भरली’ फेम अभिनेत्रीने बॉडी शेमिंगबद्दल मांडलं मत; म्हणाली, “जाड असण्याबद्दल…”
ice cream rice
सई ताम्हणकरप्रमाणे तुम्ही खाऊ शकता का आईस्क्रिम भात? विचित्र खाद्यपदार्थाचा व्हिडीओ होतोय तुफान व्हायरल
Parrot riding a bicycle
VIDEO : काय सांगता! पोपट चक्क सायकल चालवतोय; विश्वास बसत नाही, एकदा व्हायरल व्हिडीओ पाहाच
a child girl made pithle bhakari for father
लेकीचं प्रेम! चिमुकलीने वडिलांसाठी बनवली चक्क पिठलं भाकरी, व्हिडीओ पाहून तुम्हीही व्हाल भावूक

सध्या मिनी माथुरने शेअर केलेला व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल झाला असून चाहत्यांनी त्यावर लाईक्स आणि कमेंटचा वर्षाव केला आहे. पण हा व्हिडीओ कुठला आहे, या व्हिडीओमध्ये दिसणारे ते दोघे कोण आहेत हे अद्याप समोर आलेले नाही.

मिनी माथुर एक अभिनेत्रीसोबतच टीव्ही होस्ट देखील आहे. तिने इंडियन आयडल पर्व ४चे सूत्रसंचालन केले आहे. त्यापूर्वी ती एमटीव्हीवर वीजे होती. त्याबरोबर तिने ‘आय मी और मे’ या चित्रपटात काम केले आहे. तसेच तिने ‘माइंड द मल्होत्रा’ या वेब सीरिजमध्ये काम केले आहे.