सोशल मीडियावर कधी कोणता चॅलेंज नेटकऱ्यांना वेड लावेल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर ‘बॉटल कॅप चॅलेंज’ची क्रेझ पाहायला मिळतेय. सेलिब्रिटीसुद्धा हे चॅलेंज स्वीकारून त्याचे व्हिडीओ पोस्ट करत असल्याने नेटकऱ्यांमध्ये फार उत्सुकता निर्माण झाली आहे. समोर असलेल्या बाटलीचं झाकण गोल फिरून पायाने उडवायचा हा चॅलेंज आहे. काहींनी प्रामाणिकपणे हे आव्हान पूर्ण केलं तर काहींनी मजेशीर पद्धतीने हे चॅलेंज स्वीकारलं. स्टार प्रवाह वाहिनीवर सध्या गाजत असलेली मालिका ‘विठूमाऊली’ यातल्या मुख्य कलाकारानेही हे चॅलेंज स्वीकारलं आहे. मालिकेतल्या विठू माऊलींनीच बॉटल कॅप चॅलेंज पूर्ण केलं आहे.. तेसुद्धा चमत्कारिकरित्या.
टिकटॉक या अॅपवर अभिनेता अजिंक्या राऊत याने बॉटल कॅप चॅलेंजचा व्हिडीओ पोस्टकेला आहे. अजिंक्य मालिकेत विठूमाऊलींची भूमिका साकारत आहे. त्याच वेशात त्याने सेटवर हे चॅलेंज पूर्ण केलं आहे. चॅलेंज पूर्ण करण्यासाठी अजिंक्य गोल फिरला खरा पण पायाने नाही तर बॉटलसमोर फक्त हात दाखवून त्यावरील झाकण उघडलं. अजिंक्यचा हा व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे.
बॉलिवूड अभिनेता अक्षय कुमारने हे चॅलेंज पूर्ण करत इतरांना आव्हान दिलं. तेव्हापासून भारतीय कलाकारांमध्ये या बॉटल कॅप चॅलेंजची क्रेझ वाढत गेली. बऱ्याच मराठी कलाकारांनीही हे आव्हान पूर्ण केलं आहे.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on July 11, 2019 6:20 pm