28 October 2020

News Flash

‘विरुष्का’लाही ५०% डिस्काऊंटचा मोह

चेरी डिंपल या ट्विटर युझरने हा फोटो शेअर केला

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा सध्या दक्षिण आफ्रिकेतील केपटाऊनमध्ये गेले आहेत. इथे भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका यांत कसोटी सामने, एकदिवसीय सामने आणि टी२० सामने होणार आहेत. नुकताच विरुष्काचा एक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या फोटोमध्ये दोघंही मनोसोक्त शॉपिंग करताना दिसत आहेत. विराट फॅन क्लबने हा फोटो दक्षिण आफ्रिकेतीलच असल्याचे म्हटले आहे. चेरी डिंपल या ट्विटर युझरने हा फोटो सोशल मीडियावर शेअर केला आहे.

फोटोमध्ये असे काय खास आहे ज्यामुळे हा फोटो इतका व्हायरल होत आहे असा प्रश्न अनेकांना पडला आहे. फोटोत ज्या दुकानाच्या बाहेर हे दोघं उभे आहेत त्या दुकानातील सामानांवर ५० टक्के सुट असल्याचा बोर्ड दिसत आहे. सध्या या फोटोला जास्तीत जास्त ट्रोल करण्यात येत आहे. एका युझरने लिहिले की, ‘विराट- मी अजूनही लोकांना लग्नातला खर्च देत आहे आणि तू सेलमध्ये शॉपिंग करत आहेस. यावर अनुष्का त्याला दोन बॅग उचलण्याबद्दल सांगते.’

तर दुसऱ्या युझरने लिहिले की, ‘विराट- हे बघ अनुष्का मी ५० टक्केवाला माणूस नसून १०० टक्केवाला माणूस आहे. लग्नात एवढा खर्च झाला की आता सेलमध्येच खरेदी करावी लागत आहे,’ अशाही काहींनी कमेंट लिहिल्या. तर अनुष्का विराटला खरेदीसाठी विचारते तेव्हा कोहली तिला या ५० टक्के सुट असलेल्या दुकानात घेऊन येतो असे जोक्सही व्हायरल होत आहेत. अनुष्का टीम इंडियासोबत केपटाउनमध्ये कलिनन हॉटेलमध्ये थांबली आहे. इथे टीम इंडिया दक्षिण आफ्रिकेसोबत ३ कसोटी सामने, ६ एकदिवसीय सामना आणि ३ टी२० सामने खेळणार आहे.

विराट आणि अनुष्काने ११ डिसेंबरला इटलीमध्ये डेस्टिनेशन वेडिंग केले होते. लग्नानंतर दोघांनी दिल्ली आणि मुंबई या दोन्ही ठिकाणी रिसेप्शन दिले होते. या रिसेप्शनला बॉलिवूड आणि क्रिकेट जगतातील मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 1, 2018 3:58 pm

Web Title: virat kohli and anushka sharma shopping in capetown pictures viral fans troll
Next Stories
1 VIDEO: बँकॉकमध्ये गर्लफ्रेंडसोबत राजकुमारचा ‘जुम्मा-चुम्मा’ डान्स व्हायरल
2 ‘भन्साळींइतकी सहनशीलता माझ्यात नाही’
3 New Year 2018 : जाणून घ्या, बॉलिवूड कलाकारांचे नव्या वर्षातील संकल्प
Just Now!
X