24 April 2019

News Flash

यंदाची दिवाळी एकमेकांसोबत !

एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत व्यग्र वेळापत्रकामुळे एकमेकांना वेळ देता येत नसल्याची खंत अनुष्कानं बोलून दाखवली होती.

विराट अनुष्कानं घरीच दिवाळी साजरी केली.

बॉलिवूडसाठी दिवाळी ही नेहमीच वेगळी असते. दिवाळीच्या दोन दिवस आधीपासूनच बॉलिवूडमध्ये दिवाळीच्या जल्लोषाला सुरूवात होते. शाहरुख, शिल्पासह अनेक कलाकार आपल्या घरी समस्त बॉलिवूडकरांसाठी दिवाळी पार्टीचं आयोजन करतात. या पार्टीला बॉलिवूडमधल्या जवळपास सर्वच तारे-तारकांची उपस्थिती पाहायला मिळते. पण यावर्षी विराट अनुष्कानं सर्वांपासून दूर राहत एकमेकांसबोत दिवाळी साजरी करण्याचं ठरवलं.

विराट आणि अनुष्कानं दिवाळी साजरी करतानाचा फोटो सोशल मीडियावर शेअर करत आपल्या चाहत्यांना दिवाळीच्या शुभेच्छा दिल्या आहेत. विराट आणि अनुष्का गेल्यावर्षी डिसेंबरमध्ये विवाहबंधनात अडकले. यंदाची दोघांचीही पहिलीच दिवाळी, त्यामुळे या दोघांनीही ती एकमेकांच्या सहवासात साजरी केली आहे.

काही दिवसांपूर्वी एका मासिकाला दिलेल्या मुलाखतीत व्यग्र वेळापत्रकामुळे एकमेकांना वेळ देता येत नसल्याची खंत अनुष्कानं बोलून दाखवली होती. एकाच घरात राहत असलो तरी अनेकदा भेट होत नाही किंवा जास्त वेळ एकमेकांना देता येत नाही असं अनुष्का म्हणाली होती. म्हणूनच यावेळी घराला सुंदर अशी रोषणाई करत या दोघांनी घरीच दिवाळी साजरी केली.

First Published on November 8, 2018 12:05 pm

Web Title: virat kohli anushka sharma celebrate a quiet diwali