05 July 2020

News Flash

अनुष्काच्या घरी आली छोटी पाहुणी

अनुष्काने स्वत: केला फोटो शेअर

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा कायम चर्चेत असतात. गेल्या काही दिवसांपासून आधी अनुष्काच्या बिकिनीच्या फोटोवर विराटने केलेल्या कमेंटमुळे तर नंतर त्या दोघांच्या ‘बीच डेट’मुळे अनुष्का आणि विराट सारखे चर्चेत आहेत. सध्या ती पती विराट कोहलीसोबत वेस्ट इंडिजमध्ये आहे. चित्रपटांपासून दूर असल्याने अनुष्काच्या प्रेग्नन्सीबाबत मागच्या काही दिवसांपासून उलट-सुलट चर्चा सुरू आहेत. पण नुकतंच अनुष्का शर्माने सोशल मीडियावरून एक झकास न्यूज शेअर केली आहे.

विराट अनुष्काच्या घरी रात्रीच्या जेवणासाठी एक छोटी पाहुणी आली असून तिचा फोटो अनुष्काने सोशल मीडियावर शेअर केला आहे. या नव्या पाहुणीचे स्वागत अनुष्काने कल्पक पद्धतीने केले आहे. अनुष्काने तिच्या इन्स्टाग्रामवर त्यांच्या घरी आलेल्या छोट्या पाहुणीचा फोटो शेअर केला. या फोटोमध्ये एक मांजर दूध पिताना दिसत आहे. अनुष्का शर्माने हा फोटो शेअर करताना ‘आमची आजची डिनर गेस्ट’ असे लिहिले आहे.

विराट कोहली ज्यावेळी मैदानावर फटकेबाजी करत असतो, तेव्हा बहुतेक वेळी अनुष्का स्टेडिअममध्ये असते. आपल्या पतीला प्रोत्साहन देण्यासाठी ती कायम सज्ज असते. सध्या आपल्या शूटिंग आणि व्यस्त वेळापत्रकातून तिने सुटी घेतली असून ती भारताच्या संघाबरोबर विंडिज दौऱ्यावर आहे. या दौऱ्यात ती विराटसोबत वेळ घालवत आहे आणि विंडिजच्या समुद्र किनाऱ्यांवर आनंद लुटत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 25, 2019 4:56 pm

Web Title: virat kohli anushka sharma dinner guest cat milk vjb 91 2
Next Stories
1 पुस्तकाच्या सहाय्याने तयार केले ‘स्ये रा नरसिम्हा रेड्डी’चे ४२ सेट
2 ”जितनी इज्जत कमाई है, वो सब निकल जाएगी”; अक्षयने का व्यक्त केली भीती?
3 Video : पंचतारांकित हॉटेलच्या नाश्त्यात आढळल्या अळ्या; ‘कलंक’मधील अभिनेत्रीने उघड केला प्रकार
Just Now!
X