News Flash

‘विरुष्का’चा हनिमून लाहोर आणि कराचीमध्ये; सोशल मीडियावर फोटो व्हायरल

इस्लामाबादमधील फैसल मशीदच्या बाहेर उभे असलेले विरुष्काचे फोटो व्हायरल झाले आहेत

विराट कोहली, अनुष्का शर्मा

इटलीमध्ये लग्न केल्यानंतर विराट कोहली आणि अनुष्का शर्मा दोघंही रोममध्ये हनिमून एन्जॉय करत आहेत. अनुष्काने तिच्या सोशल मीडिया अकाऊंटवरून त्या दोघांचा रोममधील एक फोटो शेअर केला होता. या फोटोला चाहत्यांनी भरभरून लाइक केले आणि शेअरही केले. पण विरुष्का हनिमूनसाठी पाकिस्तानमध्ये गेले आहेत असे कुणी सांगितले तर तुम्हाला नक्कीच धक्का बसेल. भारत-पाक यांच्यातील सध्याचे संबंध पाहता ही गोष्ट शक्य नाही. मात्र, सध्या सोशल मीडियावर विराट आणि अनुष्काचे मॉर्फ केलेले काही फोटो व्हायरल झाले आहेत. या फोटोंमध्ये विरुष्काच्या मागे पाकिस्तानमधील प्रसिद्ध ठिकाणे दिसत आहेत.

हे फोटो चांगल्यापद्धतीने मार्फिंग केल्यामुळे ‘विरुष्का’ लाहोर, इस्लामाबाद आणि कराची येथे गेल्याचे अनेकांना वाटेल. कराचीमधील मजार-ए-कवायदपासून ते इस्लामाबादमधील फैसल मशीदच्या बाहेर उभे असलेले विरुष्काचे फोटो सध्या व्हायरल झाले आहेत. एवढेच काय तर पाकिस्तानमधील वैद्यकीय महाविद्यालय आणि विद्यापीठा बाहेरचा दोघांचा फोटो सोशल मीडियावर फिरत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 19, 2017 2:08 pm

Web Title: virat kohli anushka sharma honeymoon selfie hit meme in pakistan see these viral photoshopped photos
Next Stories
1 VIDEO : खिलाडी कुमार म्हणतोय, ‘पाहायला विसरु नका…. देवा’
2 पुनरागमन करु इच्छिणाऱ्या कपिलच्या मार्गातील ‘हा’ अडथळा माहितीये?
3 दीपिकाआधी हेमा मालिनी यांनी साकारलेली ‘पद्मावती’
Just Now!
X