भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांचा स्वप्नवत सुंदर विवाहसोहळा गेल्यावर्षी याच दिवशी इटलीत पार पडला होता. या दोघांच्या नात्यात अनेक चढ- उतार आले, वर्ल्ड कपच्या सामान्यात अनुष्काला घेऊन आल्यानंतर विराटनं चाहत्यांची नाराजी ओढावून घेतली. सामाना हरण्याचं खापर दोघांवर फोडलं गेलं, त्यामुळे चाहत्यांचा रोष ओढावून घेतल्यानंतर विराट अनुष्कानं आपल्या नात्याला अल्पविराम दिला. दोघंही विभक्त राहू लागले, मात्र आपल्यातलं प्रेम त्यांनी कधीही कमी होऊ दिलं नाही. आपली प्रेमकहाणी दोघांनीही पूर्णत्त्वात नेली.

११ डिसेंबर २०१७ ला इटलीत दोघांचा विवाहसोहळा पार पडला. जगभरातील तमाम चाहत्यांनी या दोघांवरही शुभेच्छांचा वर्षाव करत सहजीवनासाठी त्यांना भरभरून आशीर्वाद दिले. आज या दोघांच्या लग्नाचा पहिलाच वाढदिवस आणि त्यानिमित्तानं दोघांनीही एकमेकांसाठी एक सुंदर संदेश आपल्या इन्स्टाग्रामवर लिहित आतापर्यंत न पाहिलेले फोटो आणि व्हिडिओ शेअर केले आहे.

https://www.instagram.com/p/BrPCIGkgkC8/

चांगल्या आणि सच्च्या मनाचा व्यक्ती तुमचा जोडीदार होतो यापेक्षा दुसरं सुख नाही असं म्हणत अनुष्काला विराटला लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. तिनं या लग्नातला आतापर्यंत कधीही समोर न आलेला छोटा व्हिडिओ देखील शेअर केला.

https://www.instagram.com/p/BrPBRE7Aco6/

मला अजूनही विश्वास बसत नाहिये की आमच्या लग्नाला एक वर्ष पूर्ण झालं आहे. असं वाटतंय सगळंच कालपरवाच घडलं आहे. असं लिहित विराटनं लग्नातल्या काही खास क्षणाचे फोटो त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर करत अनुष्काला शुभेच्छा दिल्या आहेत. सध्या विराट आणि अनुष्का ऑस्ट्रेलियात आहेत तिथेच ते दोघंही आपल्या लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा करणार असल्याचं म्हटलं जात आहे.