News Flash

पैलवान अनुष्का! चक्क विराटलाच उचललं….हा व्हिडिओ पहा!

विरुष्काचा नवा व्हिडिओ व्हायरल

अभिनेत्री अनुष्का शर्मा सोशल मीडियावर चांगलीच ऍक्टिव्ह असते. ती सतत काही ना काही पोस्ट करतच असते आणि त्यामुळे आपल्या चाहत्यांच्या संपर्कात असते. कधी आपल्या मुलीसोबतचा फोटो पोस्ट करते तर कधी विराटसोबतचे क्षण शेअर करते. पण यावेळी मात्र अनुष्काचा एक वेगळाच अंदाज चाहत्यांना पाहायला मिळाला. यावेळी ती पैलवानाची भूमिका घेत आपले वायसेप्स दाखवताना दिसत आहे.

विराट आणि अनुष्काचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडिओत अनुष्का आपला पती विराट कोहली याला उचलण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. एकदा नाही तर दोनदा तिने त्याला उचललंसुद्धा! हा व्हिडिओ तिच्या चाहत्यांना तुफान आवडला आहे आणि ते तिच्या ताकदीचं कौतुकही करताना दिसत आहेत.

 

View this post on Instagram

 

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma)

अनुष्का आणि विराट यांची केमिस्ट्री पहिल्यापासूनच भन्नाट आहे. या व्हिडिओत जेव्हा तिने पहिल्यांदा विराटला उचलण्याचा प्रयत्न केला, तेव्हा ती त्याला सांगते की, तू स्वतःला उचलू नकोस. तर दुसऱ्या प्रयत्नात तिने त्याला अक्षरशः सहज उचललं. आणि यानंतर आपले बायसेप्स दाखवत लोकांच्या कौतुकालाही पात्र ठरली.

“मी करुन दाखवलं का?”, असं कॅप्शनही तिने या व्हिडिओला दिलं आहे. तिच्या या प्रश्नाचं उत्तर चाहते देत आहेत. प्रत्येकजण तिच्या ताकदीचं आणि विरुष्का या जोडीचं कौतुक करताना दिसत आहे. हा व्हिडिओ अनुष्काने शेअर केल्यापासून तो वेगाने व्हायरल होताना दिसत आहे आणि सध्या ट्रेंडिंगलाही आहे.

आईपणाच्या विश्रांतीनंतर अनुष्काने पुन्हा कामाला सुरुवात केल्याचं दिसत आहे. नुकतंच तिने एका जाहिरातीसाठी चित्रीकरणाच्या वेळचा फोटो सोशल मीडियावर शेअर केला होता. जानेवारी महिन्यात अनुष्काने मुलीला जन्म दिला. तिचं नाव ‘वामिका’ असं ठेवलं आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 7, 2021 2:26 pm

Web Title: virat kohli anushka sharma new video went viral on the internet vsk 98
Next Stories
1 ‘चिट्टीया कलाईया’ गर्लचा नवा चित्रपट; लंडनमध्ये चित्रीकरण
2 ‘मिस्टर लेले’चं शूटिंग थांबलं; ‘हे’ आहे कारण!
3 ‘या’ कारणामुळे जितेंद्र आणि हेमा मालिनी यांचे होऊ शकले नाही लग्न
Just Now!
X