भारतातील सर्वाधिक प्रसिद्ध सेलिब्रिटी जोडी क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा ११ डिसेंबरला विवाहबंधनात अडकले. कलाविश्व, क्रीडाजगत आणि प्रसारमाध्यमांमध्ये रंगलेल्या चर्चांना आणि तर्कवितर्कांना पूर्णविराम देत विरुष्काने काल एकमेकांना आयुष्यभरासाठी साथ देण्याचे वचन घेतले. इटलीतील टस्कनी येथे नातेवाईक आणि निकटवर्तीयांच्या उपस्थित या दोघांनी लग्न केले. मात्र, त्यांच्या लग्नाची कायदेशीर प्रक्रिया अद्याप बाकी आहे.

वाचा : …जेव्हा अनुष्का विराटला पाहतच मंडपात येते

Senior police inspector Daya Nayak and Salman Khan
सलमान खानच्या घराजवळ गोळीबाराचं प्रकरण, एन्काऊंटर स्पेशालिस्ट दया नायक करणार तपास
Confirmed Rohit Sharma does not stay with Mumbai Indians team in Mumbai
रोहित शर्माने सांगितलं मुंबई इंडियन्सच्या संघासह न राहण्याचं कारण; म्हणाला, “आता माझ्या हातात तर..”
Rape of accused wife
चंद्रपूर : रक्षक नव्हे राक्षसच! पोलीस हवालदाराचा आरोपीच्या पत्नीवर बलात्कार; पोलीस प्रशासनात खळबळ
Nagpur Central Jail, Notorious Gangster, Chetan Hazare , Assaulted by Inmate, crime news, police,
धक्कादायक! मध्यवर्ती कारागृहात टोळीयुद्ध, टिनाच्या पत्र्याने प्राणघातक हल्ला

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, पुढच्या वर्षी ४ जानेवारीला विराट आणि अनुष्का त्यांच्या लग्नाची नोंदणी करतील. मुंबईतील वांद्रे कोर्टात त्यांच्या लग्नाची नोंदणी करण्यात येईल. येत्या २१ डिसेंबरला नवी दिल्लीमध्ये विरुष्काच्या लग्नाचे ग्रॅण्ड रिसेप्शन होईल. यावेळी त्यांचे कुटुंबिय आणि मित्रपरिवार उपस्थित राहतील. यानंतर बॉलिवूड, क्रिकेट आणि कॉर्पोरेट जगतातील सेलिब्रिटींसाठी २६ डिसेंबरला पार्टीचे आयोजन करण्यात आले आहे.

वाचा : विराटला लग्नाची मागणी घालणाऱ्या महिला क्रिकेटरने एकाच शब्दात दिल्या शुभेच्छा!

यानंतर हे नवदाम्पत्य द.आफ्रिकेला रवाना होईल. येथे विराट त्याच्या आगामी क्रिकेट सामन्यांची तयारी करेल. तर अनुष्का त्यावेळी त्याच्यासोबत नववर्षाचा आनंद साजरा करेल. यानंतर हे दोघं जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात भारतात परतल्यानंतर अनुष्का आनंद एल रायच्या चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी सुरुवात करेल. त्याचसोबत ती ‘सुई-धागा’ चित्रपटासाठीचीही तयारी करेल.वरुण धवन आणि अनुष्का फेब्रुवारीमध्ये या चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरुवात करतील. अनुष्काचा ‘परी’ चित्रपट ९ फेब्रुवारीला प्रदर्शित होणार असल्याने त्याचे प्रसिद्धी कार्यक्रमही त्याचदरम्यान सुरु असतील.