25 February 2021

News Flash

विरुष्कालाही ‘अॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’ची भुरळ

विराट- अनुष्काचा हा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

विराट कोहली, अनुष्का शर्मा

‘अॅव्हेंजर्स: इन्फिनिटी वॉर’ हा सुपरहिरोपट प्रदर्शित झाल्यापासून जोरदार चर्चेत आहे. बॉक्स ऑफीसवर हा चित्रपट चांगलाच गल्ला जमवत असून लहानांपासून थोरांपर्यंत त्याने भुरळ घातली आहे. ७० हून अधिक सुपरहिरोंची ही गाथा पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत. अॅव्हेंजर्सच्या चाहत्यांमध्ये विरुष्का म्हणजेच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचाही समावेश झाला आहे. वाढदिवसाच्या एक दिवस आधी अनुष्काने विराटसोबत हा चित्रपट पाहिला.

बेंगळुरूतील ओरियन मॉलमध्ये सोमवारी या दोघांना पाहिलं गेलं. या मॉलमधून बाहेर पडतानाचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

वाचा : मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेला होणार सोनमचं लग्न

अनुष्काने मंगळवारी विराटसोबत वाढदिवस साजरा केला. ‘मोस्ट हॅपनिंग कपल’ म्हणून ज्या जोडीकडे पाहिलं जातं अशा विराट कोहली आणि अनुष्का शर्मा या दोघांनी पुन्हा एकदा सर्वांनाच कपल गोल्स दिले आहेत. अनुष्काच्या वाढदिवसाच्या निमित्ताने विराटने त्याच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन तिच्यासोबतचा एक फोटो पोस्ट केला. ‘हॅपी बर्थडे माय लव्ह… माझ्या आयुष्यातील सर्वाधिक सकारात्मक आणि प्रामाणिक व्यक्ती तूच आहेस…’, असं म्हणत त्याने अनुष्काला केक भरवातानाचा एक सुंदर फोटो पोस्ट केला.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on May 1, 2018 7:47 pm

Web Title: virat kohli anushka sharma watch avengers infinity war in bangalore watch video
Next Stories
1 मुहूर्त ठरला! ‘या’ तारखेला होणार सोनमचं लग्न
2 सोशल मीडियावर ‘तो’ व्हिडिओ पोस्ट करणं शिल्पाला पडलं महागात
3 Video: अॅक्शन स्टार जॅकी चेनच्या मुलीवर पुलाखाली राहण्याची वेळ
Just Now!
X