News Flash

‘विरुष्का’सोबतच्या सेल्फीमुळे ट्रोल झाला ए.आर. रेहमान

नवदाम्पत्यांना भेटायला स्टेजवर गेला असता त्याने दोघांसोबत सेल्फी काढला

‘विरुष्का’सोबतच्या सेल्फीमुळे ट्रोल झाला ए.आर. रेहमान

बॉलिवूड अभिनेत्री अनुष्का शर्मा आणि भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली यांचा २६ डिसेंबरला मुंबईत दिमाखदार रिसेप्शन सोहळा पार पडला. विरुष्काने २१ डिसेंबरला दिल्लीमध्येही रिसेप्शनचे आयोजन केले होते. या रिसेप्शनला पंतप्रधान नरेंद्र मोदीनीदेखील उपस्थिती लावली होती. तर मुंबईतील रिसेप्शनला बॉलिवूड जगतातील तसेच क्रिकेट विश्वातील अनेक नावाजलेल्या चेहऱ्यांनी आवर्जुन उपस्थिती लावली होती. प्रसिद्ध संगीतकार ए.आर. रेहमान पत्नीसह आला होता.

रेहमान जेव्हा नवदाम्पत्यांना भेटायला स्टेजवर गेला, तेव्हा त्याने दोघांसोबत सेल्फी काढला. या सेल्फीमध्ये तो सर्वात पुढे आणि त्याच्या मागे विराट, अनुष्का आणि त्याची पत्नी उभे होते. या सेल्फीमध्ये चुकून फक्त तोच फोकस झाला आणि त्याच्या माग उभे असलेले सर्वजण ब्लर झाले. रेहमानने हा फोटो त्याच्या इन्स्टाग्रामवर शेअर केला आणि तेव्हापासून तो ट्रोल होत आहे. माणसाने नेहमी स्वतःलाच महत्त्व द्यावे असेही काहींनी मेसेजमध्ये लिहिले आहे.

मुंबईतील रिसेप्शननंतर अनुष्का शर्मा विराट कोहलीसोबत साऊथ अफ्रिकेला रवाना झाले. विराट आणि अनुष्का यांचे नवे वर्ष दक्षिण अफ्रिकेत साजरे होणार आहे. तर जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात अनुष्का मुंबईत परतणार असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on December 29, 2017 8:04 pm

Web Title: virat kohli anushka sharma wedding virushka mumbai reception photos pics a r rahman with wife met anushka and virat in mumbai wedding reception ar rahman took selfie with focused himself
Next Stories
1 संदीप पाठकसाठी २०१७ ची वारी ठरली वैशिष्ट्यपूर्ण
2 अखेर अजय देवगणला त्याचे रामदेव बाबा सापडले
3 सागरिकाने युवराजसोबत शेअर केलेल्या फोटोवर हेजलची अतरंगी प्रतिक्रिया
Just Now!
X