News Flash

वामिकाला समर्पित केलं पहिलं अर्धशतक अन् अनुष्काला दिलं फ्लाईंग कीस!

विराटचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

यंदाच्या वर्षी आयपीएलमध्ये रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूची जोरदार कामगिरी आपल्याला पाहायल्या मिळत आहे. आरसीबीनं चांगली कामगिरी करत पहिले स्थान पटकावले आहे. काल बंगळुरूने १० विकेट्सनं राजस्थान रॉयल्सचा पराभव केला. देवदत्त पडिक्कलने नाबाद १०१ धावा केल्या. तर, संघाचा कर्णधार विराट कोहलीने ७२ नाबाद अशी खेळी केली. या दोघांच्या जोरावर आरसीबीनं ही बाजी मारली. आयपीएलची सुरुवात झाल्यापासून विराटने पहिल्यांदा अर्धशतक केलं. त्यानंतर त्याने एका हटके अंदाजात यावेळी सेलिब्रेशन केलं. त्याचा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झाला आहे.

हा व्हिडीओ आयपीएल टी२०च्य अधिकृत इन्स्टाग्राम अकाऊंटवरून शेअर करण्यात आला आहे. या व्हिडीओत अर्धशतक पूर्ण झाल्याने विराट सेलिब्रेश करताना दिसत आहे. त्याने पत्नी अनुष्का शर्माला फ्लाईंग कीस दिली तर हे अर्धशतक त्याने वामिकाच्या नावावर असल्याचा इशारा केला. त्याचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होताना दिसत आहे. विराटच्या चाहत्यांना त्याची ही स्टाईल प्रचंड आवडल्याचे दिसत आहे.

 

View this post on Instagram

 

A post shared by IPL (@iplt20)

विराट आणि अनुष्काने डिसेंबर २०१७मध्ये लग्न केलं. तर ११ जानेवारी २०२१ रोजी वामिकाचा जन्म झाला. या दोघांनी वामिकाला मीडियापासून लांब ठेवण्याचा निर्णन घेतला आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 23, 2021 4:02 pm

Web Title: virat kohli blows kisses to anushka sharma dedicates half century to daughter vamika ipl 2021 dcp 98
Next Stories
1 ‘देवों के देव महादेव’ फेम मोहित रैनाला करोनाची लागण, रुग्णालयात केलं दाखल
2 सलमान खानच्या ‘राधे’ वर सोशल मीडियावर बहिष्कार; ट्रेलर पाहून सुशांतचे चाहते भडकले
3 सकारात्मक बातमीः अभिनेत्री सुश्मिता सेनने उपलब्ध करुन दिले ऑक्सिजन सिलेंडर्स
Just Now!
X