देशभरात करोना विषाणूच्या प्रादुर्भावामुळे भीतीचे वातावरण आहे. लाखो लोकांना करोनाचा फटका बसला आहे. प्रत्येक देश आपापल्या परीने या व्हायरसशी झुंज देत आहे. विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. करोनाचा फटका क्रीडा विश्वालाही बसला असून बहुतांश क्रीडा स्पर्धा रद्द झाल्या आहेत. भारतात धर्म मानल्या जाणाऱ्या क्रिकेटच्या स्पर्धादेखील काही काळ स्थगित करण्यात आल्या असून IPL चे आयोजन लांबणीवर ढकलण्यात आले आहे. त्यामुळे टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आपली पत्नी अनुष्का शर्मा हिच्यासोबत घरातच आहे.

विराट आणि अनुष्का ही जोडी त्यांच्या एकमेकांवरील प्रेमामुळे कायम चर्चेत असते. चाहत्यांच्या गराड्यात असो किंवा सोशल मीडियावर असो, दोघेही एकमेकांवर असलेले प्रेम मुक्तपणे व्यक्त करतात. काही दिवसांपूर्वी अनुष्काच्या एका फोटोवर विराटने कमेंट केली होती. त्यानंतर आज अनुष्काने पुन्हा एक छानसा फोटो पोस्ट केला. मागच्या वेळी अनुष्काने तिचा एक छानसा फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत ‘घरात कोणकोणत्या ठिकाणी सूर्याचा प्रकाश छान येतो हे आता मला माहिती झालं आहे’, अशी पोस्ट केली होती. त्याच पोस्टनंतर आजच्या फोटोत तिने याच संदर्भात कॅपशन लिहिली आहे. ‘मी तुम्हाला म्हंटलं होतं ना की मला घरातल्या सूर्यप्रकाशाच्या जागा माहीत झाल्या आहेत’, असे तिने फोटोखाली लिहिले आहे.

 

View this post on Instagram

 

I told you I knew all the sunlight spots

A post shared by AnushkaSharma1588 (@anushkasharma) on

तिच्या फोटोवर ५ तासांतच १६ लाख चाहत्यांनी लाईक केले, तर आठ हजार चाहत्यांनी कमेंट केली. विराट तर अनुष्काचा तो फोटो पाहून ‘क्लीन बोल्ड’ झाला. विराटला त्या फोटोवर काय रिप्लाय करावा यासाठी शब्द सुचले नाहीत. त्यामुळे त्याने थेट एक लाल बदामाचे ईमोजी आणि एक डोळ्याच्या जागी लाल बदाम असलेले इमोजी अशी कमेंट करत आपलं प्रेम व्यक्त केलं.

अनुष्काच्या आधीच्या फोटोवरही चाहत्यांनी लाइक्स आणि कमेंट्सचा पाऊस पाडला होता. त्या फोटोवर विराटने ‘लावण्यवती’ (Gorgeous) अशी कमेंट केली होती.