सोशल मीडियावर सध्या एकमेकांना फिटनेस चॅलेंज देण्याचा ट्रेंड सुरु आहे. प्रत्येक जण आपल्या जवळच्या व्यक्तीला टॅग करुन हे चॅलेंज देत आहे. यामध्ये क्रिकेटपटू आणि बॉलिवूड अभिनेतेही मागे नाहीत. नुकतेच भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली याने आपली पत्नी आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा हीला हे चॅलेंज दिले. विशेष म्हणजे अनुष्कानेही हे आव्हान स्वीकारत लगेच वेट लिफ्टींगही करुन दाखवले. हा वेटलिफ्टींग करतानाचा व्हिडियो तिने आपल्या ट्विटर अकाऊंटवर शेअर केला आहे. यामध्ये तिने जीमची पॅंट पिवळ्या रंगाचा टीशर्ट आणि स्पोर्ट शूज घालून हा वर्कआऊट करुन दाखवला आहे. व्हिडियोच्या सुरुवातीला हा आपला आवडीचा वर्कआऊट आहे असेही अनिष्का सांगते.

खेळमंत्री राजवर्धन राठोड यांनी हा चॅलेंजचा ट्रेंड सुरु केला असून त्यांनी तो विराट कोहली, अभिनेता ऋतिक रोशन, सायना नेहवाल यांच्याकडे वळवला आहे. विराटने हे पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी, आपली पत्नी अनुष्का शर्मा आणि क्रिकेटपटू एम.एस. धोनी यांच्याकडे पास केले आहे. अनुष्काने हे चॅलेंज पुढे क्रिकेटपटू दिनेश कार्तिकची पत्नी आणि स्क्वॅशपटू दिपिका पल्लीकल आणि वरुण धवन यांना हे चॅलेंज दिले आहे. याबरोबरच अनुष्काने राज्यवर्धन राठोड यांनी फिटनेसचे आव्हान देणे सुरु केल्याने त्यांचे आभारही मानले आहे.