करोना विषाणूमुळे सध्या देशभरात लॉकडाउन आहे. क्रिडा स्पर्धांपासूनचे ते सिनेमांची चित्रीकरणांपर्यंत सारं काही ठप्प आहे. क्रिकेटपटू, अभिनेते, त्यांचे सहकारी सारे घरात राहून करोनाविरोधात आपली सामाजिक जबाबदारी पार पाडत आहेत. अशा परिस्थितीमध्ये चाहत्यांशी संपर्कात राहण्यासाठी सारेच जण सोशल मीडियाचा आधार घेताना दिसत आहेत. नुकताच भारताचा कर्णधार विराट कोहली आणि त्याची पत्नी अभिनेत्री अनुष्का शर्मा हे दोघे त्यांच्या इमारतीच्या आारावात क्रिकेट खेळताना दिसले. लॉकडाउनमुळे घरात बसून कंटाळल्यामुळे अखेर त्यांनी तो पर्याय स्वीकारला होता.

विराट-अनुष्कामधील तो क्रिकेटचा व्हिडीओ खूप व्हायरल झाला होता. त्यानंतर आता आणखी एक क्रिकेटचा व्हिडीओ सध्या व्हायरल होत आहे. बॉलिवूडचा अभिनेता अर्जून कपूर याने एक व्हिडीओ आपल्या इन्स्टाग्रामवर शेअर केला. त्या व्हिडीओमध्ये एक माणसाने स्वत: हळूच गोलंदाजी केली. त्यानंतर चेंडू स्टंपपर्यंत पोहोचायच्या आधीच त्याने बॅट हातात घेत फलंदाजी केली. मग फटकावलेला चेंडू त्याने स्वत:च अडवला आणि स्वत: नॉन स्ट्राईकवरील स्टंपवर फेकला. या दरम्यान, धाव घेणाऱ्या रनरची भूमिकादेखील त्याने स्वत:च पार पाडली. विशेष म्हणजे त्यानंतर त्याने स्वत:च विकेटसाठी अपीलदेखील केले.

 

View this post on Instagram

 

All cricket lovers right now? @virat.kohli do you relate??

A post shared by Arjun Kapoor (@arjunkapoor) on

अर्जूनने हा व्हिडीओ पोस्ट करून विराटला विचारलं की तु स्वत:ला लॉकडाउन काळात या व्हिडीओतील माणसाच्या जागी पाहतोस का? सगळे क्रिकेटप्रेमी सध्या हेच करत आहेत, असेही अर्जूनने लिहिले. त्याच्या व्हिडीओवर विराटने रिप्लाय देण्याआधीच अभिनेत्री कतरिना कैफने त्यावर उत्तर दिलं. ती म्हणाली की मी सध्या याच स्थितीतून जात आहे.

कतरिनाला क्रिकेट खेळायला आवडतं हे अनेकाना माहिती आहे. टायगर जिंदा है या चित्रपटाच्या शूटिंग दरम्यान सेटवर ती क्रिकेट खेळतानाचा व्हिडीओ व्हायरल झाला होता. त्यानंतर काही महिन्यांपूर्वी प्रदर्शित झालेल्या भारत या चित्रपटाच्या सेटवर देखील तिने प्रकाशझोतातील क्रिकेटचा आनंद लुटला होता. त्या व्हिडीओमध्ये कतरिना चांगल्या प्रकारचे फटकेदेखील गोलंदाजीवर लगावले होते.