28 September 2020

News Flash

‘विरुष्का’ला पाकिस्तानी क्रिकेटपटूंसह सेलिब्रिटींकडून लग्नाच्या शुभेच्छा

शाहिद आफ्रिदी, शोएब अख्तर यांनी दिल्या लग्नाच्या शुभेच्छा

अनुष्का आणि विराटच्या मेहंदीच्या कार्यक्रमातील एक क्षण. (छाया सौजन्य- ट्विटर)

टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा विवाहबंधनात अडकले. काही दिवसांपूर्वीच विराट कोहली आणि अनुष्का शर्मा यांचे कुटुंबीय इटलीला रवाना झाले होते. यावरून दोघेही लवकरच विवाह करणार असल्याची अटकळ बांधण्यात येत होती. तसेच इटलीच्या मिलानमधील एक आलिशान हॉटेलही ९ ते १२ डिसेंबरदरम्यान आरक्षित करण्यात आले होते. अखेर आज दोघेही सात फेरे घेत लग्नबेडीत अडकले. आज रात्री ९ वाजण्याच्या सुमाराला दोघांतर्फे अधिकृतपणे त्यांच्या विवाहाबाबतची घोषणा करण्यात आली. या विवाहसोहळ्यासाठी काही निमंत्रितांनाच बोलावण्यात आले होते. यामुळे ‘विरुष्का’चे चाहते नाराज झाले होते. परंतु, येत्या २२ डिसेंबरला मुंबईमध्ये जय्यत स्वागतसमारंभ आयोजित करण्यात आल्याचे समजते. ‘विरूष्का’ने ट्विटरवरून चाहत्यांना लग्नाची गोड बातमी दिल्यानंतर अनेकांकडून त्यांना शुभेच्छा दिल्या जात आहेत. यामध्ये पाकिस्तानी क्रिकेट खेळाडुंसह अनेक सेलिब्रिटींचा समावेश आहे.

Next Stories
1 झायरा वसिमच्या प्रसंगाविषयी करिना म्हणते, ‘महिला लढवय्या आहेत’
2 इटलीत विराट-अनुष्काचा विवाहसोहळा संपन्न
3 ‘फुकरे रिटर्न्स’ला यश मिळूनही का भडकली रिचा?
Just Now!
X