News Flash

बायकोसाठी विराट कोहलीने असे व्यक्त केले प्रेम

काहींनी विराटची मस्करी करण्याचाही प्रयत्न केला. काहींनी त्याला अनुष्कावरुन लक्ष काढून क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला

विराट कोहली आणि अनुष्का शर्मा

विराट कोहलीचे आपल्या बायकोसाठी असलेले प्रेम साऱ्या जगाला माहित आहे. तो या ना त्या मार्गाने त्याचे अनुष्कावर असलेले प्रेम नेहमीच दाखवत असतो. आताही त्याने अनुष्कासाठीचे त्याच्या मनातील प्रेम अख्या जगाला हटके पद्धतीने दाखवले आहे. काही दिवसांपूर्वी अनुष्काचा परी हा सिनेमा प्रदर्शित झाला होता. या सिनेमानिमित्तही विराटने तिचे भरभरून कौतुक केले होते. विराटने तिच्या कौतुकासाठी एक इन्स्टाग्राम पोस्टही लिहिली होती. तर अनुष्काही सध्या विराटला पाठिंबा दर्शवण्यासाठी त्याचे अनेक आयपीएलचे सामने मैदानात जाऊन पाहते. मैदानात सामना पाहताना ती विराटला त्याच्या उत्तम कामगिरीसाठी फ्लाइंग किस देतानाही दिसते.

आता विराटने पुन्हा एकदा अनुष्कासाठी एक इन्स्टाग्राम पोस्ट लिहिली आहे. इन्स्टाग्रामवर त्याने दोघांचा फोटो शेअर करत म्हटले की, ‘सच अ स्टनर माय लव ऑफ माय लाइफ। @अनुष्का’. विराटच्या या कॅप्शनवर अनेकांनी कमेंट द्यायला सुरूवात केल्या. अनेकांनी कमेंटमध्ये हेच लिहिले की, वा.. काय प्रेम आहे. तर काहींनी विराटची मस्करी करण्याचाही प्रयत्न केला. काहींनी त्याला अनुष्कावरुन लक्ष काढून क्रिकेटवर लक्ष केंद्रीत करण्याचा सल्ला दिला. एका युझरने लिहिले की, भावा एवढं प्रेम आरसीबीवरही कर.

दरम्यान, विराटने आयपीएलच्या या हंगामात २०१ धावा करत अव्वल स्थान गाठले आहे. कोहलीने, मी सर्व प्रकारच्या खेळात उत्तम फलंदाजी करु शकतो परंतू डिव्हिलियर्ससारखे फटके खेळू शकत नसल्याचे सांगितले. या आधी डिव्हिलियर्सने विराटचे कौतुक केले असून सध्याच्या क्रिकेट विश्वातील विराट कोहलीहा सर्वोत्तम फलंदाज असल्याचे म्हटले आहे. २०११ पासून कोहली आणि डिव्हिलियर्स आरसीबीसाठी एकत्र खेळत आहे. आयपीएलच्या इतिहासात या दोन्ही स्टार क्रिकेटपटूंनी आपल्या फलंदाजीने क्रिकेट चाहत्यांना अनेक आनंदाचे क्षण दिले आहेत. आयपीएलमध्ये कोहली आणि डिव्हिलियर्सने दोनवेळा दोनशे धावांची भागीदारी केली आहे. ट्वेंटी-ट्वेंटी क्रिकेटमध्ये अशी विक्रमी भागिदारी करणारी जगातील ही एकमेव जोडी आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 21, 2018 6:05 pm

Web Title: virat kohli posted a lovlely message in social media with beautiful picture for wife anushka sharma
Next Stories
1 ट्विंकल खन्नाला विमानात डासांचा त्रास, बुडण्याऐवजी डेंग्यूने मरण्याचा धोका जास्त असल्याची खोचक प्रतिक्रिया
2 Photos: मिलिंद सोमण पुन्हा बोहल्यावर
3 Video: अभिषेकचा फोन चोरुन पाहायची ऐश्वर्या? अनेक प्रश्नांची दिली उत्तरं
Just Now!
X