News Flash

वामिका विराटसारखी दिसते की, अनुष्कासारखी?; क्रिकेटरच्या बहिणीने दिले उत्तर

एका चाहत्याने थेट विराट कोहलीची बहिण भावनाला वामिका विषयी प्रश्न विचारला आहे.

वामिकाची एक झलक पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत.

क्रिकेटपटू विराट कोहली आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा यांची मुलगी वामिका ही अतिशय लोकप्रिय स्टारकिड आहे. वामिकाचे अनेक फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले होते. पण एकाही फोटोमध्ये तिचा चेहरा दिसला नाही. तिची एक झलक पाहण्यासाठी सर्वजण उत्सुक आहेत. वामिका विराट सारखी दिसते की अनुष्कासारखी हे पाहण्यासाठी चाहते आतूर आहेत. एका चाहत्याने थेट विराट कोहलीची बहिण भावनाला वामिका विषयी प्रश्न विचारला आहे.

विराटची बहिण भावना ढिंगरा कोहलीने इन्स्टाग्रामवरील ‘Ask me Anything’च्या माध्यामातून चाहत्यांशी संवाद साधला. दरम्यान एका चाहत्याने ‘तू वामिकाला भेटली आहेस का? ती विराट सारखी दिसते की अनुष्कासारखी?’ असा प्रश्न विचारला होता. त्यावर भावनाने उत्तर देत म्हटले की, ‘हो, मी वामिकाला भेटले आहे. ती एक एंजल आहे.’ पण भावनाने वामिका कोणासारखी दिसते याचे उत्तर मात्र दिले नाही. सध्या विराटच्या बहिणीने दिलेले उत्तर सोशल मीडियावर चर्चेत आहे.

आणखी वाचा : ‘काम मिळवण्यासाठी सारानं अक्षरश: माझ्यापुढे हात जोडले’, रोहित शेट्टीने केला होता खुलासा

Virat Kohli, anushka sharma, Bhawna, Anushka Sharma daughter Vamika, vamika photos, virushka, virat sister bhawna,

दुसऱ्या एका यूजरने भावनाला प्रश्न विचारला की, ‘वहिनी चेतना आणि अनुष्का शर्मा विषयी काही सांग.’ त्यावर उत्तर देत भावनाने ‘त्या दोघी खूप चांगल्या आहेत. माझे त्यांच्यावर प्रेम आहे’ असे म्हटले.

Virat Kohli, anushka sharma, Bhawna, Anushka Sharma daughter Vamika, vamika photos, virushka, virat sister bhawna,

वामिका आणि अनुष्काचा विमानतळावरचा एक फोटो व्हायरल झाला होता. या फोटोमध्ये अनुष्काने वामिकाचा चेहरा झाकला होता. हा फोटो विराट आणि अनुष्का इंग्लंडला जाताना काढण्यात आला होता. सध्या अनुष्का वामिका सोबत वेळ घालवत आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 12, 2021 1:01 pm

Web Title: virat kohli sister bhawna reveals how anushka sharma daughter vamika looks like avb 95
Next Stories
1 ‘हसीन दिलरुबा’साठी पहिली चॉईस नव्हती तापसी पन्नू… ; समोर आली नवी माहिती
2 “चाहत्यांकडून पहिल्यासारखे प्रेम मिळत नाही..”, अमिताभ यांनी व्यक्त केली खंत
3 सुशांतची ‘ती’ इच्छा अपूर्णच राहिली; रेमो डिसूजाने केला खुलासा
Just Now!
X