12 August 2020

News Flash

क्षणभर विश्रांती… अनुष्कासोबत विराटचा इंग्लंडच्या रस्त्यांवर सफरनामा!

या लव्हबर्डचा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली पत्नी अनुष्कासोबत इंग्लंडच्या रस्त्यावर फिरताना दिसला आहे. या लव्हबर्डचा फोटो सध्या सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.

पाकिस्तानबरोबरच्या विजयानंतर भारतीय संघाने सध्या ब्रेक घेतला आहे. रविवारच्या विजयानंतर भारताच्या पुढील सामन्याला बराच अवधी बाकी असल्यामुळे संघाला ब्रेक देण्यात आला आहे. या संधीचं सदुपयोग विराट आणि अनुष्कानं केला आहे.

सध्या सोशल मीडियावर विराट- अनुष्काचे लंडनच्या रस्त्यांवर मनमुराद फिरतानाचा फोटो व्हायरल होत आहेत. विराट कोहलीच्या फॅन क्लबने इन्स्टाग्रामवर दोघांचे काही फोटो शेअर केले आहेत. या फोटोला कॅप्शन देताना त्यांनी लिहिलं की, विराट आणि अनुष्का लंडनमधील ओल्ड बॉण्ड स्ट्रीटवर आज एकत्र दिसले. सध्या टीम इंडिया आयसीसी वर्ल्ड कप २०१९ मध्ये एका छोट्या ब्रेकवर आहे. टीम इंडियाचा पुढचा सामना शनिवारी अफगाणिस्तानविरोधात आहे. त्यामुळे सध्या विराट- अनुष्का एकमेकांसोबत वेळ घालवत आहेत.

(आणखी : मैदानाबाहेरही कोहलीच ‘विराट’! मोडला सचिनचा हा विक्रम)

भारतीय संघातील खेळाडूंच्या पत्नी आणि कुटुंबीय इंग्लंडमध्ये त्यांच्यासोबत राहत असल्याचे दिसून आले आहे. अनुष्का शर्माशिवाय रोहित शर्माची पत्नी सामन्यादरम्यान दिसून आली होती. बीसीसीआयनं भारतीय खेळाडू आणि सपोर्ट स्टाफच्या पत्नी आणि कुटुंबीयांना १५ दिवसांपर्यंत थांबण्याची परवानगी दिली आहे.

 

View this post on Instagram

 

@virat.kohli and @anushkasharma on the old bond street in London today ! I love Anushka’s new haircut

A post shared by BleedKohlism2.0 (@bleedingkohlism) on

दरम्यान, भारातय कर्णधार विराट कोहलीचे सध्या पूर्ण लक्ष शनिवारी होणाऱ्या अफगाणिस्तान विरोधातील सामन्यावर आहे. त्यानं आधीच स्पष्ट केले आहे की, अफगाणिस्तान संघाबरोबरही आम्ही पूर्ण क्षमतेनं उतरणार आहोत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on June 20, 2019 9:31 am

Web Title: virat kohli with anushka sharma spotted in london after world cup match against pakistan photo viral on social media nck 90
Next Stories
1 मैदानाबाहेरही कोहलीच ‘विराट’! मोडला सचिनचा हा विक्रम
2 चोकर्सच… दक्षिण आफ्रिकेचे विश्वचषक विजयाचे स्वप्न पुन्हा भंगले
3 Cricket World Cup 2019 : शाकिबसाठी ऑस्ट्रेलियाची व्यूहरचना!
Just Now!
X