07 March 2021

News Flash

‘कर्णधारपद सोडून का देत नाहीस?,’ विराट कोहलीवर भडकला अभिनेता

'टीम इंडियाची सर्वात मोठी चूक ही होती की त्यांनी न्यूझीलंडला कमी लेखलं,' असं म्हणत या अभिनेत्याने विराटवर टीका केली.

विराट कोहली

विश्वचषक स्पर्धेच्या उपांत्यफेरीत न्यूझीलंडने भारताला १८ धावांनी पराभूत केले. या पराजयासह भारताचे तिसऱ्यांदा विश्वचषक जिंकण्याचे स्वप्न धूळीस मिळाले. या सामन्यानंतर सर्वच स्तरांतून प्रतिक्रिया येऊ लागल्या आहेत. त्यातच अभिनेता कमाल आर खान (केआरके) याने ट्विटरच्या माध्यमातून भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहलीवर राग व्यक्त केला. ‘कर्णधारपद सोडून दे’ असा सल्लाच त्याने विराटला दिला आहे.

‘टीम इंडियाची सर्वात मोठी चूक ही होती की त्यांनी न्यूझीलंडला कमी लेखलं. आपण हा सामना सहज जिंकू असं भारतीय खेळाडूंना वाटलं. जिंकलो किंवा हरलो तरी आम्हाला पाठिंबा दिला पाहिजे असं विराट म्हणाला होता. पण विराट, तू आधी आम्हाला हे सांग की आपण जिंकलो तरी कधी? तुला तर आयपीएलमध्येही विजयी होता आलं नव्हतं. तुझ्या पराभवानंतरही लोकांनी तुला सर्वोत्तम खेळाडू म्हटलं आहे,’ अशा शब्दांत केआरकेनं राग व्यक्त केला.

‘तुला हे माहीत असायला हवं होतं की इतिहासातला तू सर्वांत वाईट कर्णधार आहेस. तू कर्णधारपद सोडून का देत नाहीस? असं केल्यास तुला जाहिराती तरी कशा मिळतील ना,’ असा खोचक टोलाही त्याने विराटला लगावला.

एकीकडे भारतीय संघावर टीका होत असताना दुसरीकडे संघाच्या कामगिरीची अनेकांनी वाहवा केली. बॉलिवूड अभिनेता आमिर खानने भारतीय संघासाच्या पराभवानंतर ट्विट करत संघाला धीर दिला आहे. त्या पाठोपाठ अनेक बॉलिवूड कलाकारांनी देखील ट्विट केले आहे. यामध्ये अभिनेते बोमन इराणी, आयुषमान खुराना, सुनिल शेट्टी, वरूण धवन, अनुपम खेर या अभिनेत्यांचा समावेश आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 11, 2019 8:04 pm

Web Title: virat kohli world cup 2019 semi finals india loss to new zealand krk tweet ssv 92
Next Stories
1 श्रद्धाच्या लग्नाच्या चर्चांवर शक्ती कपूर म्हणतात..
2 ‘लागीरं झालं जी’ फेम सुमन काकींची रुपेरी पडद्यावर एण्ट्री
3 Video : विठुमाऊलींचा चमत्कारिक ‘बॉटल कॅप चॅलेंज’ पाहिलात का?
Just Now!
X