News Flash

“ही वेब सीरिज तुम्ही पाहाच”; विरेंद्र सेहवागने ‘अवरोध’वर केला कौतुकाचा वर्षाव

सेहवागने दिला चाहत्यांना 'ही' सीरिज पाहण्याचा सल्ला

भारतीय सैनिकांनी पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईवर आधारित ‘उरी: द सर्जिकल स्ट्राईक’ हा चित्रपट तुम्ही पाहिला असेल. भारतीय जवानांच्या याच प्रराक्रमावर आधारित आता आणखी एक वेब सारिज प्रेक्षकांच्या भेटीस आली आहे. ‘अवरोध: द सीज विदीन’ असं या सीरिजचं नाव आहे. या सीरिजवर भारतीय क्रिकेट फलंदाज विरेद्र सेहवाग याने कौतुकाचा वर्षाव केला आहे. ज्ञात घटनेमागची अज्ञात कथा तुम्ही देखील पाहाच, अशी विनंती त्याने आपल्या चाहत्यांना केली आहे.

“दान नकोय आम्हाला काम हवय”; जेष्ठ अभिनेत्री महाराष्ट्र सरकारवर संतापल्या

विरेंद्र सेहवागने ‘अवरोध: द सीज विदीन’ या सीरिजची स्तुती करणारा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. “आपल्या देशासाठी जिंकण ही एक अशी भावना आहे जिचं तुम्ही शब्दात वर्णन करु शकत नाही. आपल्या सैनिकांचे पराक्रम पाहून मी नेहमीच रोमांचित होतो. अलिकडेच मी सोनी लिव्ह अॅपवर ‘अवरोध’ नावाची एक सीरिज पाहिली. ही सीरिज मला खूप आवडली. या सीरिजमध्ये भारतीय सैनिकांनी पाकिस्तानवर केलेल्या सर्जिकल स्ट्राईकची गोष्ट दाखवण्यात आली आहे. ही सीरिज तुम्ही देखील पाहा तुम्हाला नक्की आवडेल.” असं म्हणत सेहवागने अवरोध या सीरिजचं कौतुक केलं आहे. त्याचा हा व्हिडीओ सध्या सर्वांचेच लक्ष वेधून घेत आहे.

“सुशांतच्या वडिलांकडे त्याचा फोन नंबर नव्हता”; अंकिता लोखंडेचा धक्कादायक खुलासा

राहुल सिंग आणि शिव अरूर यांनी लिहिलेलं पुस्तक ‘इंडियाज मोस्ट फीअरलेस’मधील ‘वी डोण्ट रिअली नो फीअर’ या पहिल्या प्रकरणावर बेतलेली ही सीरिज आहे. अनेक महिने विस्तृत संशोधन केल्यानंतर आणि लष्करी अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर या घटनेकडे विविध कोनांतून बघणारी कथा आकाराला आली आहे. या सीरिजवर टीमने दोन वर्षांहून अधिक काळ मेहनत घेतली आहे. राज आचार्य यांनी दिग्दर्शित केलेल्या ‘अवरोध’मध्ये अमित साधने मेजर टांगो ही भूमिका साकारली आहे. या मोहिमेचे नेतृत्व करणाऱ्या ३५ वर्षीय अधिकाऱ्याच्या व्यक्तिमत्वाचे हे पडद्यावरील स्वरूप आहे. याशिवाय दर्शन कुमार, पावैल गुलाटी, नीरज कबी, मधुरिमा तुली, अनंत महादेवन, विक्रम गोखले आणि आरिफ झकेरिया हे कलावंत विविध भूमिका साकारत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 1, 2020 2:06 pm

Web Title: virender sehwag avrodh the siege within uri the surgical strike mppg 94
Next Stories
1 कार्तिकने सांगितला ‘दिल बेचारा’मधील आवडता सीन; दुसऱ्यांदा पाहणार चित्रपट
2 ‘आशिकी’चे गाणे या पाकिस्तानी गाण्याची कॉपी? विवेक अग्नीहोत्रीने शेअर केला व्हिडीओ
3 VIDEO : ..अन् माणसांना पाहून सिंह पळू लागले; बिग बींनी सांगितला ‘तो’ अनुभव
Just Now!
X