25 February 2021

News Flash

टाळ्या-थाळ्या झाल्या, आता डीजे वाजवायचा का?; बॉलिवूड गायकाचा केंद्राला सवाल

बॉलिवूड गायकाचा करोनावरुन सरकारवर टोला

बॉलिवूड गायक आणि संगीत दिग्दर्शक विशाल दादलानी सोशल मीडियावर प्रचंड सक्रिय असतो. समाजात घडणाऱ्या विविध घडामोडिंवर तो कायम प्रतिक्रिया देत असतो. यावेळी त्याने करोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर सरकारवर निशाणा साधला आहे. करोना थांबवण्यासाठी डीजे वाजवून पाहूया का? असा उपरोधिक टोला विशालने लगावला आहे.

अवश्य पाहा – छत्रपती शिवाजी महाराजांचा एकेरी उल्लेख करणाऱ्या केतकीला दिग्दर्शकाने सुनावले खडेबोल

करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. अगदी लॉकडाउनचा पर्याय स्विकारुनही करोना नियंत्रणात आलेला नाही. उलट लॉकडाउनच्याच काळात देशभरातील लाखो लोकांना करोनाची लागण झाली. या पार्श्वभूमीवर विशाल दादलानी याने ट्विट करुन सरकारवर टीका केली. “शेठ, देशात ५०० करोना पेशंट होते तर टाळ्या थाळ्या वाजवल्या आता आठ लाख झाले आहेत. आपण डीजे वाजवून पाहूया का?” असं ट्विट करत त्याने उपरोधिक टोला लगावला आहे.

अवश्य पाहा – “काँग्रेसचा हात भाजपाच्या हातात”; राजस्थानमधील घडामोडींवर अभिनेत्याची टीका

दर तासांला एक हजारांपेक्षा जास्त करोनाबाधित रुग्ण देशात आढळून येत आहेत. देशात गेल्या चार दिवसांत एक लाख नवीन करोनाबाधित रुग्णांची वाढ झाल्यामुळे चिंतेत वाढ झाली आहे. देशातील एकूण करोनाबाधित रुग्णांची संख्या आठ लाख्यांच्या पुढे गेली आहे. आरोग्य मंत्रालयानं दिलेल्या माहितीनुसार, गेल्या २४ तासांत देशात २७ हजार ११४ नवीन करोना रुग्णांची वाढ झाली आहे. एका दिवसातील ही आतापर्यंतची सर्वात मोठी वाढ आहे. देशात दोन लाख ८३ हजार ४०७ रुग्णांवर उपचार सुरु आहेत. तर आतापर्यंत पाच लाख १५ हजार ३८६ रुग्ण बरे झाले आहेत. मागील २४ तासांत ५१९ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. देशात आतापर्यंत २२ हजार १२३ करोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. महाराष्ट्र, तमिळनाडू, गुजरात आणि दिल्लीत मोठ्या प्रमाणावर रुग्ण सापडत आहेत.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on July 13, 2020 4:59 pm

Web Title: vishal dadlani comment on narendra modi over coronavirus mppg 94
Next Stories
1 ‘कसौटी जिंदगी की २’मध्ये काम करणाऱ्या अभिनेत्याला झाला करोना
2 “काँग्रेसचा हात भाजपाच्या हातात”; राजस्थानमधील घडामोडींवर अभिनेत्याची टीका
3 ‘तुझी बहीण तुझा बिझनेस सांभाळते, मग नव्या…’, नेपोटीझमवरुन करण पटेलचा कंगनाला अप्रत्यक्ष टोला
Just Now!
X