28 September 2020

News Flash

गृहमंत्री म्हणजे घरी बसायचं असं त्यांना कोणी सांगितलंय का?; अमित शाह यांना विशालचा खोचक सवाल

देशाला अदृश्य गृहमंत्री लाभले आहेत, असं म्हणत त्याने अमित शाह यांच्यावर टीका केली.

गायक, संगीतकार विशाल दादलानी, केंद्रीय गृहमंत्री अमित शाह

प्रसिद्ध संगीतकार व गायक विशाल दादलानी सोशल मीडियावर त्याच्या ट्विट्समुळे नेहमीच चर्चेत असतो. चालू घडामोडींवर तो बेधडकपणे त्याची मतं मांडताना दिसतो. नुकत्याच केलेल्या एका ट्विटमध्ये त्याने केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधला आहे. ‘गृहमंत्री म्हणजे त्यांनी घरीच बसायचं असं अमित शाह यांना कोणी सांगितलंय का’, असा खोचक सवाल त्याने केला. देशभरात इतक्या घडामोडी घडत असताना ते अजूनही का शांत आहेत असा प्रश्न विचारत विशालने त्यांच्यावर टीका केली.

या ट्विटमध्ये विशालने लिहिलं, ‘खरंच, गृहमंत्री म्हणजे त्यांनी घरीच बसायचं असं अमित शाह यांना कोणी सांगितलंय का? देशात इतक्या घडामोडी घडत असताना, इतक्या समस्या असताना आपल्याला अदृश्य गृहमंत्री लाभले आहेत. प्रसारमाध्यमंही त्यांना काहीच प्रश्न विचारत नाहीत.’

आणखी वाचा : करोनामुळे रेस्टॉरंट सर्व्हरचा मृत्यू; आलिया भट्टने लिहिली भावनिक पोस्ट

तबलिगी मरकज प्रकरण असो किंवा मग वांद्रे येथील गर्दीचे प्रकरण असतो, करोना व्हायरसचे मोठे संकट देशासमोर असताना गृहमंत्री अमित शाह अजूनही शांत का आहेत, असा सवाल त्याने उपस्थित केला आहे. विशालने याआधीही ट्विटरच्या माध्यमातून सरकारच्या कामावर प्रश्नचिन्ह उपस्थित केले होते.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 18, 2020 10:09 am

Web Title: vishal dadlani questions home minister amit shah ssv 92
Next Stories
1 करोनामुळे रेस्टॉरंट सर्व्हरचा मृत्यू; आलिया भट्टने लिहिली भावनिक पोस्ट
2 ‘हे प्रश्नदेखील नक्की विचार’; स्वरा भास्करने बबिता फोगटला दिली प्रश्नांची यादी
3 तेलुगू सिनेकर्मचाऱ्यांना बिग बींची मदत; दिले इतके कोटी रूपये
Just Now!
X